esakal | #COVID19 : जनता कर्फ्युतही 'तिने' 64 रुग्णांना पोचविले सिव्हिलमध्ये! 
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance 123.jpg

नाशिक शहर-जिल्ह्यामध्ये मोफत धावणाऱ्या 108 रुग्णवाहिका 41 आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवेसाठी 108 रुग्णवाहिका सज्ज होती. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणांवरून 64 रुग्णांना या 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  

#COVID19 : जनता कर्फ्युतही 'तिने' 64 रुग्णांना पोचविले सिव्हिलमध्ये! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता.22) "जनता कर्फ्यू'दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी सातच्या दरम्यान 12 तासांमध्ये 108 रुग्णवाहिकेने 64 रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या 64 रुग्णांसाठी 108 रुग्णवाहिका खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली. दरम्यान, ऐनवेळी कोरोना संशयित रुग्णाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वतंत्र तीन 108 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक शहर-जिल्ह्यामध्ये मोफत धावणाऱ्या 108 रुग्णवाहिका 41 आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवेसाठी 108 रुग्णवाहिका सज्ज होती. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणांवरून 64 रुग्णांना या 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  

स्वॅबच्या नमुन्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह

नाशिक शहरासह जिल्ह्यात रविवार (ता. 22)पर्यंत एकही कोरोना व्हायरस बाधित रुग्ण नसल्याचे प्राप्त झालेल्या वैद्यकीय चाचणी अहवालातून समोर आले आहे. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 297 नागरिकांपैकी 54 संशयितांचे वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. शनिवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षासह नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चार संशयित रुग्ण दाखल होते. या संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल रविवारी प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आहेत.

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा थायलंडहून आलेल्या आणखी एका संशयितास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबच्या नमुन्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यालाही रविवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले असून, त्याची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या 44 नागरिकांची 14 दिवस नियमित तपासणी करण्यात आली असून, त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

loading image