esakal | मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

amit thackeray

मनविसेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकारणाची सुरुवात भारतीय विद्यार्थी संघटनेपासून झाली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतं त्यांचे चिरंजीव अमित यांनी देखील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पद स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरचं स्विकारू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.(Amit-Thackeray-about-responsibility-of-MNS-Vidyarthi-Sena-jpd93)

जबाबदारी स्विकारण्यास तयार
मनविसेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अमित यांना माध्यमांनी विचारले असता मनविसेचा प्रदेशाध्यक्ष होण्यास आवडेल, माझे नाव या पदासाठी घेतले जात असल्याने मला आनंद आहे. मात्र राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली तरचं स्विकारेल अशी भुमिका घेतली.


सहा विभाग प्रमुखांशी चर्चा

राजकारणाची बाराखडी शिकतं आता मुख्य प्रवाहात येण्याची तयारी करणाऱ्या अमित ठाकरे यांची नेते पदी निवड झाल्यानंतर प्रथमचं माध्यमांसमोर ते औपचारीक गप्पा मारताना बोलले. नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित यांनी आज (ता.१७) सकाळी मनसेच्या राजगड कार्यालयाला भेट दिली. सहा विभाग प्रमुखांशी चर्चा करताना प्रभाग निहाय माहिती जाणून घेतली. मनसेची सत्ता असताना चाळीस नगरसेवक होते. सत्ता संपुष्टात येत असताना एक-एक करून ३० ते ३५ नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. सन २०१७ च्या निवडणुकी मध्ये मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. मागच्या टर्म मध्ये निवडून आलेल्या चाळीस मनसे नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सध्याची राजकीय, विकास कामांची परिस्थिती अमित ठाकरे यांनी जाणून घेतली. निवडणुकीच्या निमित्ताने तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रभाग निहाय पदाधिकायांची नियुक्ती केली जाणार असून राजदूत म्हणून ते मनसेच्या सत्ता काळात झालेली कामे, भविष्यातील कामे नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.

महापालिका निवडणुकीत सक्रीय
पुढील वर्षी नाशिक महापालिकेबरोबरचं राज्यातील १३ ते १४ महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांमध्ये मनसे संपुर्ण ताकदीने उतरणार असून निवडणुकीची सर्व सुत्रे अमित ठाकरे यांच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. निवडणुक तयारीचा भाग म्हणून नाशिक मध्ये दर महिन्याला येवून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपने इंधनाचे दर कमी करावे
मनसेने परप्रांतियांचा मुद्दा बाजुला केल्यास भाजप-मनसे युती शक्य असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यावर कोटी करताना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी भाजपने इंधनाचे दर कमी केले तरचं मनसे युतीचा विचार करेल असे वक्तव्य करतं पाटील यांच्यावर शेलक्या भाषेत पलटवार केला.

हेही वाचा: परब, नार्वेकरांच्या बंगल्याची चौकशी सुरु - चंद्रकांत पाटील

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

loading image