esakal | अनिल परब, मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याचीही चौकशी सुरु - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

परब, नार्वेकरांच्या बंगल्याची चौकशी सुरु - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : काय माहीत, रात्री कुणाला अटक झाली तर!, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहज केलेल्या एका सूचक वक्तव्यानं राजकीय क्षेत्राच्या भूवया उंचावल्या. हे वक्तव्य नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी काल (ता.१६) पत्रकारांशी गप्पा मारताना केलं. पण आज रात्रीतून अटक म्हटंलो पण नाव नव्हते घेतले. तसेच खूप जणांच्या चौकशी सुरु आहेत, ज्या अटकेच्या दिशेने आहेत. तसेच अनिल परब, मिलिंद नार्वेकर बंगल्याची चौकशी सुरु आहे असे आज (ता.१७) चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (anil-parab-and-milind-narvekars-bungalows-enquiry-begun-said-chandrakant-patil-jpd93)

राज यांच्यासोबत चहा घ्यायला हरकत नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरेही नाशिकमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकतो. त्यांच्या आणि माझ्या वेळा जुळल्या तर त्यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला हरकत नाही, असं सांगतानाच नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होईल की नाही हे सांगणं माझा अधिकार नाही. असं काही ठरलं नाही. तसेच परस्पर निर्णय घेण्यासाठी मी प्रसिद्धही नाही, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

आघाडीचा गेम सुरू

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याची खिल्ली उडवली. मी मारतो तू लागल्यासारखं कर असं यांचं सुरू आहे. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. 2022मध्ये निवडणुका आहेत. हा सर्व गेम सुरू आहे. तीन पक्षात रोज सकाळी गेम सुरू होतात आणि दिवसभर कोणी काय गेम खेळायचा हे त्यात ठरते, असा टोलाही त्यांनी लगावला.

अण्णांनीही मागणी केली होती

जरंडेश्वरच्या निमित्ताने सर्वच कारखान्यांची चौकशी करा म्हणालो. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आधीच चौकशीची मागणी केली आहे, असं ते म्हणाले. अनिल देशमुख यांची मालमत्ता सील करण्यात आली, ही ईडीची कारवाई आहे. ईडीचा अर्थच आर्थिक अनियमितात मॉनिटरींग करणं असा होतो, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: नाशिकमध्ये भाजपमध्ये नाराजी; काही प्रभागांना झुकते माप

सहकारावर चर्चा नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यांनी दिल्लीत सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहकारावर चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. ही रुटीन भेट होती. सहकार विषयाबाबत त्यांच्यात चर्चा झाली नाही असं वाटतं, असं त्यांनी सांगितलं.

loading image