Amrut Kalash Yatra: जय श्रीरामाच्या जयघोषात अमृत कलश रथयात्रेचे वणीत जल्लोषात स्वागत

Amrut Kalash Rath Yatra welcomed with great jubilation chanting of Jai Shri Rama nashik
Amrut Kalash Rath Yatra welcomed with great jubilation chanting of Jai Shri Rama nashikesakal

वणी : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटात केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर श्री तुलसीपीठाधिश्वर पद्मविभूषण जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्यजी महाराज यांच्या अमृत जन्ममहोत्सवानिमित्त हनुमान सेवा ट्रस्ट आयोध्याच्यावतीने काढण्यात आलेल्या अमृत रथाचे वणी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हा रथ देशभरातील ७५ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावून तेथील पवित्र माती व जलाचे संकलन करत सुमारे २६ हजार किमी चा प्रवास करत रामजन्मभुमी अयोध्येकडे रवाना होणार आहे. (Amrut Kalash Rath Yatra welcomed with great jubilation chanting of Jai Shri Rama nashik)

अयोध्येहुन १० नोव्हेंबर रोजी प्रारंभ होऊन देशभरात सुमारे २६ हजार किमी चा प्रवास करत सुमारे ७५ ठिकाणचे जल तसेच मातीचे संकलन करत पुन्हा अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या हनुमान सेना ट्रस्ट च्या अमृत रथाचे आज गुजरात राज्यातून सापूतारा मार्गे दुपारी तीन वाजेच्या सुमारास वणी येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आगमन झाले.

यावेळी भाविकांनी सदर रथाचे जोरदार स्वागत केले. दरम्याण रथ मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच सवाद्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता.

Amrut Kalash Rath Yatra welcomed with great jubilation chanting of Jai Shri Rama nashik
Nashik News: NDPS कारवाई, तपासाबाबत पोलिसांसाठी कार्यशाळा

संपुर्णतः सजवलेल्या रथावर अमृत कलशासह श्रीराम, सिता व हनुमानाची भव्य प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होती. सदर रथ ता. १४ जानेवारी रोजी अयोध्येत दाखल होणार असुन प्रवासी दरम्याण भाविकांनी दान दिलेली सामग्री १००८ कुण्डीय यज्ञासाठी रामानंद मिशन यांच्याकडे सोपवणार असल्याचे हनुमान सेवा ट्रस्टच्या संयोजकांनी सांगीतले.

यावेळी सप्तशृंग निवासीनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, नितीन सातपुते, अजीत थोरात, सुरेश वर्मा, पद्माकर पैठणे, शाम जाधव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Amrut Kalash Rath Yatra welcomed with great jubilation chanting of Jai Shri Rama nashik
SA vs IND 3rd T20I LIVE : नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, मालिका वाचवण्यासाठी भारताचा लागणार कस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com