नाशिक: राज्य शासनाने लोकप्रिय शंभर रुपयामध्ये ‘आनंदाचा शिधा’ ही योजना बासनात गुंडाळली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे या योजनेला फटका बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील आनंदाचा गोडवा हिरावला जाणार आहे.