Nashik : सुंदर- स्वच्छ नाशिक, मात्र मंदिरे दुर्लक्षित!

temples leakage due to roots of grass bushes on rooftop
temples leakage due to roots of grass bushes on rooftopesakal

नाशिक : ‘सुंदर- स्वच्छ नाशिक, मात्र, मंदिरे दुर्लक्षित’, अशी गत तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेल्या गोदावरीकाठच्या शहरातील मंदिरांची झालीयं. देशभरातून आलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना कळस-शिखर दर्शनाऐवजी त्यावर वाढलेल्या गवत-झुडपांचे दर्शन घडते. गवतासह झाडाझुडपांच्या मुळांमुळे मंदिरे गळू लागली आहेत. (ancient godaghat temples leakage due to roots of grass bushes Nashik News)

esakal

पावसाळ्यानंतरही सुरू असलेल्या पावसामुळे अनेक मंदिरांवर झाडेझुडपे वाढली आहेत. काही मंदिरांवर करपलेले गवत दृष्टिक्षेपात येते. त्यामुळे मंदिराचे सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे. मोठ्या परिश्रमाने दगडावरील कोरीव काम करून बांधलेल्या मंदिराचा घुमट, शिखरात गवत व झाडांची मुळे शिरल्याने बांधकामासही धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. गोदावरीच्या काठावर भाविक व पर्यटकांनी पाहावीत, अशी अनेक मंदिरे आहेत. समाधीस्थळेही आहेत. त्यावरील अप्रतिम नक्षीकाम त्यातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. गवत आणि झाडाझुडपांच्या मुळांमुळे अनेक मंदिरे पावसाळ्यात गळू लागली आहेत. यात काळाराम मंदिराचा समावेश होतो.

मुळातच, मंदिरांची डागडुजी अथवा स्वच्छता करण्याचे काम मंदिर ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांची असते. त्यात मंदिराचे मालक अथवा विश्वस्तांचा समावेश आहे. पावसाळ्यात दरवर्षी गोदावरीस पूर येतो. त्यावेळी मंदिरांमध्ये वाहून आलेला गाळ, चिखल धुवून काढण्याचे काम महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे दरवर्षी केले जाते. गोदाकाठावर प्रामुख्याने गंगा गोदावरी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, अतिप्राचीन सुंदर नारायण मंदिर, बाणेश्वर मंदिर, अहिल्याराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, श्री नारोशंकर मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, कपूर थळा मंदिर या मंदिरांना भाविक आणि पर्यटक आवर्जून भेट देतात.

esakal
temples leakage due to roots of grass bushes on rooftop
Nashik : ‘लक्ष्मीचे पावले पडती घरा, तोचि दिवाळी-दसरा’
esakal

मंदिर म्हणजे घर

‘मूळ मंदिर’ (संस्कृत) या संज्ञेचा अर्थ घर. मराठीत तो देवालय असाही होतो. मानवी जीवनाचे नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजेच देवदेवता, अशाप्रकारची श्रद्धा जगातील अनेक समाजात आढळते. देव-देवतांचे प्रतीक रूपाने अथवा मूर्तींच्या रूपाने भाविकास दर्शन घडविणारे स्थळ म्हणजे मंदिर होय. मंदिरात दैवी शक्ती व सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो, अशी सर्वसामान्य श्रद्धा असते. अतिप्राचीन काळापासून जगात सर्वत्र मंदिरे बांधलेली दिसतात. मात्र, त्यांच्या स्वरूपात फार मोठे वैविध्य आढळते.

"प्राचीन काळापासून मंदिर-देव व संस्कृती पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. मंदिर व देवामुळे भक्तिभाव वाढतो. आराजकता माजू नये, यासाठी माणसावर कोणाचा तरी धाक हवा. कोणालाही कोणी फसवू नये, चोरी करू नये, अमूक केले तर अनर्थ होईल, तमूक केले तर उपयोग होईल, अशी भावना देवामुळे मनात येते. कृत्य अथवा कर्मामुळे अडचण आली, मनाविरुद्ध घडले तर माणूस मंदिरात जातो. त्यातून चांगला मार्ग मिळाला, उपाय झाला तर देवावरची श्रद्धा वाढते. हवा आपणास दिसत नाही, पण हवेतील ऑक्सीजनवर आपण जगतो."

-ॲड. अतुल गर्गे, विश्वस्त, श्री भद्रकाली मंदिर

"गोदावरीकाठावरील मंदिरे बहुतेक वैयक्तिक मालकीची अथवा विश्‍वस्तांच्या ताब्यात आहेत. त्यांनी दर तीन-चार महिन्यांनी परिसर व मंदिरांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. जेणेकरून नाशिक भाविक व पर्यटकांना आवडेल. काही मंदिरांवरील झाडे गेल्या आठवड्यातच काढली आहेत. त्यामुळे मंदिरांचे मुळ रूप पाहावयास मिळते. गोदावरीस पूर येतो, त्यावेळी पाण्याबरोबर बऱ्याच वस्तू, लाकडे, झाडे वाहून येतात. ते महापालिकेतर्फे काढली जातात. मंदिरापुढील चिखल, घाण महापालिका काढते. कोरोना काळात मंदिरांकडे सर्वांचेच लक्ष नव्हते. भाविकांची संख्याही कमी होती, पण आता भाविक व पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. काही मंदिरावरील वाढलेले गवत, झाडेझुडपे पाहून पर्यटक व भाविक नाराजी व्यक्त करतात."

-अलोक गायधनी, पुरोहित

temples leakage due to roots of grass bushes on rooftop
Nashik : निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली रम्य ‘सकाळ’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com