Latest Marathi News | निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली रम्य ‘सकाळ’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employees of 'Sakal' who participated in Panjarpol Area Tour

Nashik : निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली रम्य ‘सकाळ’!

नाशिक : पक्ष्यांचा किलबिलाट... गाईंचा हंबरडा आणि सोबत सूर्याची कोवळी किरणे झेलत दैनिक ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह चुंचाळे येथील पांजरापोळच्या ७५० एकरवरील निसर्गाची सफर केली. झाडे, वेली, पशु-पक्षी, सेंद्रिय शेतीसह जैवविविधता पाहून सर्वांचीच मने प्रफुल्लीत झाली. निमित्त दैनिक ‘सकाळ’तर्फे रविवारी (ता. १६) चुंचाळे-सारूळ शिवारातील पांजरपोळ शिवारभेटीचे. (employees of Sakal along with their families nature trip to 750 acres of Panjrapole in Chunchale Nashik News)

नाशिकच्या पंचवटी पांजरापोळ (SNPP) जैवविविधता क्षेत्रांतर्गत चुंचाळे-सारूळ शिवारातील ७५० एकरावरील वनराईत स्थापलेल्या गोशाळेला रविवारी ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह भेट दिली. सुरवातीला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश झामरे, व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) संजय पाटील, जाहिरात व्यवस्थापक सुनील पाटील, शेड्यूलिंग विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक दिलीप रजपूत, प्रॉडक्शन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील परब यांच्यासह संपूर्ण टीमचे स्वागत केले.

गोमातेचे पूजन करून डॉ. झामरे यांनी पांजरापोळमधील जैवविविधतेची माहिती दिली. त्यानंतर सुरू झाली दोन ट्रॅक्टरद्वारे शिवाराची सफर. वृद्ध, अनुत्पादक, दिव्यांग, अशा १३०० हून अधिक गायींची आयुष्यभरासाठी घेतली जाणारी काळजी बघून सर्वचजण गोशाळा व्यवस्थापनसमोर नतमस्तक झाले. गीर, डांगी, पुंगुनूरू आदी देशी गायींचे संगोपन येथे केले जाते.

पाणी अडवा- पाणी जिरवा चारी

डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविणे, पाणथळ भागातील पाणी वाहून नेण्यासाठी या चाऱ्यांचा उपयोग वाखाणण्यासारखा होता. याठिकाणी ३ फूट रुंद, सरासरी ५ फूट खोल, अशी एकूण सुमारे ४० हजार फूट लांबीच्या चाऱ्या खोदल्या आहेत. या चाऱ्या जमिनीत पाणी जिरवून जास्तीचे पाणी आपल्या जलसंवर्धन तळ्याकडे नेतात. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा आजूबाजूच्या सर्वच शेतकऱ्यांना झाला आहे.

मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश झामरे.

मार्गदर्शन करताना डॉ. प्रकाश झामरे.

जलसंवर्धन तळे

परिसरातील २६ जलसंवर्धन तळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. ज्यात कोट्यवधी लिटर पाण्याचे संवर्धन केले जाते. तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत कमीत कमी चार फूट पाणी शिल्लक राहते. पाणी नियोजनासाठी ‘तुषार’ व ‘ठिबक’ सिंचन या परिणामकारण पद्धतीचा अवलंब सुखावणारा ठरला. चोख पाणी नियोजनामुळे परिसरातील तलावांमध्ये बदके, राजहंस व माशांचे संवर्धन केले जाते. सुमारे ३५० पेक्षा जास्त प्रजातींची लाखांहून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यात औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

मधुमक्षिका पालन

मधमाशी पेट्यांच्या सहाय्याने हा प्रकल्प मध गोळा करून विकण्यासाठी नव्हे, तर परागीभवनासाठी चालवला जातो. चांगल्याप्रकारे परागीभवन झाल्यामुळे अन्नधान्य व इतर शेती उत्पादनांमध्ये वाढ दिसून येते. याचा फायदा फक्त पांजरापोळच नव्हे, तर आजूबाबाजूच्या शेतकऱ्यांना झाला आहे. मिटिंग पॉईंटवर बोगनवेल, इतर फुलझाडे व वृक्षलागवड करून सुशोभीकरण केले आहे. त्यासोबतच याच क्षेत्रातून जमविलेल्या नैसर्गिक साधनांपासून बनविलेली एक मोठी झोपडी आहे. या जागेला फोटो पॉईंट आहे. येथे धान्य व पाणी ठेवल्यास सकाळी मोर, पोपट व इतर पक्षी येतात. २०० हून अधिक मोरांचा वावर डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला.

सूर्यफूल, बर्डहाऊस आणि बरेच काही

पांजरपोळच्या क्षेत्रातील सूर्यफुल सौंदर्यात भरच घालत नाहीत, तर मधमाशांसाठी परागकण गोळा करण्यास उपयुक्त ठरतात. ज्यामुळे परागीकरणासच चालना मिळते. मोर, पोपट व इतर पक्षी सूर्यफुलाच्या बिया खाण्यासाठी येतात. त्यामुळे एकप्रकारे बर्ड हाऊस तयार झाले असून, १४० पक्षीनिवारे क्षेत्रात लावले आहेत.

हेही वाचा: Agriculture News : परतीच्या पावसाच्या विश्रांतीमुळे मका काढणीला वेग

ट्रॅक्टरद्वारे सफारी करतानाचा क्षण

ट्रॅक्टरद्वारे सफारी करतानाचा क्षण

नवतंत्रज्ञानाचा अवलंब

मुरघास खड्डे, गांडूळखत प्रकल्प, अंतर्गत नर्सरी, पॉलीहाउस, सौरविद्युत प्रकल्प, पथदीवे, रेडियम बोर्ड, संरक्षक भिंत, ट्रॅक्टर- ट्रॉली सफारी, लहान मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, गवत कापणी यंत्र.

प्रमाणित सेंद्रिय उत्पादने

अंतर्गत जलस्रोत, शेण, गोमूत्र, चारा आदी सर्व नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून प्रमाणित सेंद्रिय गाईचे दूध, तूप यासोबतच आंबा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच आणि इतर हंगामी फळे, भाज्या येथे वर्षभर उपलब्ध असतात. पंचवटी, मुंबईतील नरिमन पॉइंट कार्यालय आणि ‘www.snpp.in/shop’ या वेबसाइटवर ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

संत साहित्यातील निसर्ग

०संत तुकाराम महाराजांचा ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी | पक्षीही सुस्वरे आळविती ||
०संत ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्‍वरीमध्ये कपोत म्हणजे पारव्याचे चित्रण केलेयं. ते असे-पै पारिवा जैसा किरीटी | चढला नभाचिये पाठी | पारवी देखोनिया लोटी | आंगचि सगळे ||
०संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे संत जनाबाई, संत कबीर, संत सावता माळी, संत चोखामेळा आदी संत आपणाला अभंगाद्वारे निसर्गावर प्रेम करायला शिकवतात.

हेही वाचा: Nashik : संगणकाच्या युगात रोजनिशीचे महत्त्व कायम