Nashik : ‘लक्ष्मीचे पावले पडती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diwali vibes news

Nashik : ‘लक्ष्मीचे पावले पडती घरा, तोचि दिवाळी-दसरा’

जुने नाशिक : ‘लक्ष्मीचे पावले पडती घरा, तोचि दिवाळी-दसरा’, असे म्हटले जाते. दिवाळीत नागरिक लक्ष्मीमातेच्या पावलांसह विविध सजावट करतात. यानिमित्त बाजारात विविध आकाराचे लक्ष्मीमातेच्या पावलांचे प्रतीक पावले, शुभ-लाभ आणि स्टिकर व रांगोळी विक्रीस आली आहे. दिवाळीच्या खरेदीची तेथूनच सुरवात होत आहे.

हेही वाचा: Nashik : महापालिका शाळा परिसरात कचऱ्याचे ढीग

भारतीय संस्कृतीत दिवाळी सणास अतिशय महत्त्व आहे. दिवाळीच्या आठवडाभर वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, बलिप्रतिपदा, असे सण साजरे होतात. पुराणांमध्ये या सर्व सणांचे माहात्म्य विशद केले आहे. यानिमित्त ‘लक्ष्मीचे पावले पडती घरा, तोचि दिवाळी-दसरा’, असे म्हटले जाऊ लागले. अर्थात लक्ष्मीचे पाऊल घरात पडणे शुभ असते, त्यातून घरात सुख येते व व्यवसायात भरभराटी येते. लक्ष्मीमातेची सदैव कृपा राहाते. त्यामुळे दिवाळीत घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट केली जाते. सजावटीत विशेष करून घरात प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस लक्ष्मीचे पावले लावली जातात.

हेही वाचा: Nashik : नेत्रविकारावरील प्रभावी उपचारांवर मंथन

उंबर, तोरण लावली जातात. पूर्वी रंगाच्या सहाय्याने पावले तयार केली जात होती. उंबरवर नक्षीकाम केले जात होते. बदलत्या काळात सर्वच प्रथा, परंपरा बदलत आहेत. धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण सोयीनुसार सर्व गोष्टी करीत आहे. यानिमित्त बाजारात विविध आकाराचे ॲक्रिलीक, प्लॅस्टिक, लाकडांमध्ये तयार केले आणि रेडियमचे लक्ष्मी पावलांचे प्रतीक पावले, शुभ-लाभ आणि ओम, स्टिकर, रांगोळी, उंबरपट्टी, प्लॅस्टिकचे तोरण, स्वस्तिक, श्रीगणेशा, स्वस्तिकवर श्रीगणेशा, दोन्ही बाजूला हत्ती त्यावर शुभ-लाभ लिहिलेले, लाकडातून तयार केलेले रिद्धी-सिद्धी नाव अशा वस्तू विक्रीस दाखल झाल्याआहेत. बाजारात विक्रीस आलेले लक्ष्मीचे पावले, उंबरपट्टी खरेदी केल्यानंतरच पुढची खरेदी केली जात आहे. या वस्तू विक्री करणारे विक्रत्यांनी रविवार कारंजा परिसरातील गणरायाच्या मंदिराजवळच दुकाने थाटली आहेत.

हेही वाचा: Nashik : संगणकाच्या युगात रोजनिशीचे महत्त्व कायम

‘लक्ष्मीचे पावले’, तसेच ‘शुभ-लाभ’ घर, दुकानात लावणे शुभ मानले जाते. पुरातन काळापासून प्रथा-परंपरा असल्याने नागरिक ‘लक्ष्मीचे पावले’, ‘उंबरपट्टी’, ‘शुभ- लाभ’ घेण्यासाठी येत आहेत. खरेदीचा उत्साह अधिक दिसून येत आहे.

- गणेश उलाटे, विक्रेता