Nashik News : नांदगाव आगाराच्या मनमानीविरोधात संतप्त विद्यार्थ्यांचे बस अडवून ठिय्या आंदोलन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students and citizens protesting by blocking buses in the village against the chaos of Nandgaon Agar.

Nashik News : नांदगाव आगाराच्या मनमानीविरोधात संतप्त विद्यार्थ्यांचे बस अडवून ठिय्या आंदोलन!

नांदगाव (जि. नाशिक) : आगारातील बसच्या ढिसाळ नियोजनामुळे चांदोरा (ता. नांदगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असल्याने व शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या कारणातून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बस अडवित ठिय्या आंदोलन केले. (Angry students blocked bus and protested against arbitrariness of Nandgaon depot Nashik News)

तालुक्यातील चांदोरा गावातून मोठ्या संख्येने विद्यार्थी नांदगावला माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी नियमित जातात. त्यासाठी आगाराने पासेस देखील दिले आहेत. मात्र शालेय व महाविद्यालयीन वेळेत नांदगावला जाण्यासाठी सुटणारी बस नेहमीप्रमाणे वेळेत येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला व वेळेत जाण्यासाठी पाच ते सात किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ येते .

परिवहन महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता.४) शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावात आलेल्या बसपुढे ठिय्या आंदोलन करत नांदगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व प्रकाराला नांदगाव आगाराची धरसोडवृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थी आणि पालक यांनी केला.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Start Up : धुळ्यातील स्मार्ट तरुणांची स्टार्ट अपमधील किमया

विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनाची माहिती पोलिस प्रशासन यांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोचत विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर विद्यार्थ्यांनी नांदगाव आगारात चौकशी करण्यासाठी असलेला फोन कधीही उचलला जात नसल्यामुळे शालेय वेळापत्रकाचे पालन होत तर नाहीच शिवाय पाच ते सात किमी अंतरावर पायपीट करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यांनतर घटनेची माहिती आगारप्रमुख यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही त्यासाठीचा नेमका मार्ग ठरवून वेळेचे नियोजन केले जाईल अशी लेखी हमी आगारप्रमुखांनी दिल्याने बसरोको आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा: Nashik News : मालेगावला विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई; 2 दिवसात 75 हजार दंड वसुल