
Lumpy Disease : जनावरांचा आठवडे बाजार लम्पी स्किन आजारामुळे बंद!
मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात जनावरांवरील ‘लम्पी’ या संसर्गजन्य रोगाचा वेगाने प्रसार होत आहे. या आजाराने गायी, म्हशी, बैल, रेडे, गोऱ्हे मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात तालुक्यातून तसेच बाहेरगावाहून जनावरे विक्रीसाठी आल्यानंतर ‘लम्पी’ या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
(animal weekly market closed due to lumpy skin disease Nashik news)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
हेही वाचा: Nashik News: नदीपात्रात शोधाव्या लागतात मोकळ्या जागा; नगररचना आराखड्यात जागा शिल्लक नसल्याचा परिणाम
येथील गुरांच्या आठवडे बाजारामुळे रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार होवू नये, पशुधन दगावू नये, यासाठी शुक्रवारी (ता. १६) येथील मुख्य बाजार आवारात भरणारा बैल, गाय, म्हशी आदी गुरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. येथील बाजार आवारात शेतकरी, व्यापाऱ्यांनी आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Garbage in city : शहरातील कचऱ्यात 10 टक्के वाढ!; रात्रीची 20 ठिकाणी घंटागाडी सुरू