नांदगाव : अंजुम कांदे ठरल्यात मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२ | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली : ‘Dazzles’ इव्‍हेंटच्या वतीने मिसेस इंडिया वर्ल्ड : २०२२ पुरस्काराचा बहुमान स्वीकारताना अंजुम कांदे सोबत मागील स्पर्धेतील विजेत्या व परीक्षक

अंजुम कांदे ठरल्यात मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२

नांदगाव (जि.नाशिक) : देशातील फॅशन जगतातील सर्वोत्तम सौंदर्य पुरस्काराने यंदाचा बहुमान नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांना नुकताच दिल्लीत झालेल्या एका सभारंभात बहाल करण्यात आला. नवी दिल्ली येथे जगातील सर्वोत्तम ब्युटी पीजंट ऑर्गनायझेशन कंपनी असलेल्या ‘डिजेल्स’ इव्‍हेंटच्या वतीने मिसेस इंडिया वर्ल्ड : २०२२ या पुरस्काराचा बहुमान अंजुम कांदे यांना मिळाला.

महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा आदी राज्यांतून सहभागी झालेल्या प्रत्येकी तीन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सौंदर्य, बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि करुणा यांचे उदाहरण देणाऱ्या विवाहित आणि अविवाहित भारतीय महिलांना ओळखण्यासाठी डिजेल्स इव्हेंटमध्ये दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या स्पर्धा झाल्या.

हेही वाचा: माय फॅशन : ‘स्वतःची स्टाइल शोधा’

आपली बौद्धिक क्षमता, सामाजिक कार्य आणि भविष्यातील समाजहिताच्या विविध योजना या अतिशय आशावादी व्यक्तिमत्वाच्या जोरावर अंजुम कांदे यांनी अंतिम फेरीत यशाचे शिखर गाठले. त्यांनी मराठमोळी नऊवारी साडी परिधान करीत रॅम्प वॉक करून उपस्थित व परीक्षकांना चकित केले. उच्चशिक्षित असलेल्या अंजुम कांदे सतत समाजसेवेत कार्यरत असतात. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील युवती व महिलांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम त्या राबवितात. देवाज हेल्थ ॲण्ड फाउंडेशन, समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आरोग्य सेवेतही त्यांचे मोठे योगदान आहे. एक उत्तम गृहिणी, माता, यशस्वी व्यावसायिक, सेवाभावी समाजसेविका या विविध भूमिका त्या जबाबदारपणे यशस्वीरीत्या सांभाळताना त्यांनी नव्या युगाची प्रेरणा घेत सौंदर्य स्पर्धेत भाग घेत स्वतःला सिद्ध केले, ही उल्लेखनीय बाब आहे.

हेही वाचा: फक्त फॅशनच नाही, सोन्याचे दागिने घालण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या

सौंदर्य स्पर्धेसारख्या नवीन क्षेत्रात पाऊल टाकताना अंजुम कांदे यांनी आपल्या संस्कृतीचे भान ठेवले. आपल्या मतदारसंघातील महिला व युवतींना आपली संस्कृती, संस्कार, घर संसार सांभाळत नव्या युगातही स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करु शकते, क्षेत्र कोणतेही असो स्त्री ते आव्हान स्विकारण्याची क्षमता ठेवते, ही प्रेरणा त्यांनी दिली आहे. या यशानंतर जुलै महिन्यात साऊथ कोरिया येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याचा मान यानिमित्ताने अंजुम कांदे यांना मिळाला आहे.

Web Title: Anjum Kande Has Become Mrs India World 2022 In New Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top