esakal | BREAKING : नाशिकमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी...अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

corona test 12.jpg

पेठरोड पंचवटी, नाशिक येथील 36 वर्षीय पुरुष 22 मे 2020 रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल झाले. त्यापूर्वी काही दिवस त्यांना ताप, घशात दुखणे व श्वसनाचा त्रास होत असल्याने ते 21 मे 2020 रोजी झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता व रक्तातील साखरेचे प्रमाण 600 पेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळून आले,

BREAKING : नाशिकमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी...अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील पेठरोड पंचवटी येथील 36 वर्षीय कोरोना संसर्गित पुरुष रूग्णाचे आज (25 मे 2020) रोजी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे निधन झाले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार

या संदर्भात माहिती देताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे की, पेठरोड पंचवटी, नाशिक येथील 36 वर्षीय पुरुष 22 मे 2020 रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल झाले. त्यापूर्वी काही दिवस त्यांना ताप, घशात दुखणे व श्वसनाचा त्रास होत असल्याने ते 21 मे 2020 रोजी झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता व रक्तातील साखरेचे प्रमाण 600 पेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळून आले, तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (spo2) कमी होत असल्याचे दिसून आले. म्हणून त्यांचे घशाचे नमुना तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे संदर्भीत करण्यात आले. 

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात येत नव्हते

जिल्हा रूग्णालयात त्यांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना मार्फत योग्य ते उपचार सुरू होते. 22 मे 2020 रोजी सायंकाळी त्यांच्या घशाचा नमुना अहवाल कोरोना बाधित असा आला. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने पूर्णवेळ ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात येत नव्हते. 24 मे 2020 रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही आज 25 मे 2020 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळवले आहे.

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

loading image
go to top