An anti-extortion squad, along with an inn accused of forced theft, was arrested.
An anti-extortion squad, along with an inn accused of forced theft, was arrested.esakal

Nashik Crime : जबरी चोरीतील सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

Nashik Crime : गेल्या महिन्यात जबरी चोरी करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. रवींद्र दिलीप गांगुर्डे (३५, रा. निलगिरी बाग, यश लॉन्ससमोर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Anti extortion squad arrests innkeeper for extortion Nashik Crime)

आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १७ मेस जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार गांगुर्डे गुन्हा केल्यापासून पसार होता. खंडणीविरोधी पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान, संशयित गांगुर्डे हा औरंगाबाद रोड परिसरात येणार असल्याची खबर अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना मिळाली होती.

त्यानुसार, खंडणीविरोधी पथकाने सोमवारी (ता. ५) सापळा रचला आणि गांगुर्डे यास नांदूर नाका परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी आडगाव पोलिस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

An anti-extortion squad, along with an inn accused of forced theft, was arrested.
Jalgaon Crime News : वृद्धाला लोखंडी पाइपने मारहाण

सदर कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक दिलीप भोई, सहायक निरीक्षक दिलीप सगळे,

हवालदार किशोर रोकडे, राजेश भदाने, योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर, विठ्ठल चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व सविता कदम यांनी केली.

An anti-extortion squad, along with an inn accused of forced theft, was arrested.
Crime News: '...म्हणून मी जगाचा निरोप घेतोय', सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com