Sanskrit Drama : संस्कृत नाटक, रंगकर्मींची ससेहोलपट... राज्यनाट्य स्पर्धेव्यतिरिक्त राज्यात एकही स्पर्धा नाही

Drama
Dramaesakal

Sanskrit Drama : संस्कृत नाटकांना प्रतिसाद मिळूनही संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेशिवाय महाराष्ट्रात एकही स्पर्धा होत नसल्याचे रंगकर्मींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर वर्षाभरात राज्य नाट्य स्पर्धेत एक प्रयोग होत असेल तर मेहनत का करावी, असा प्रश्न रंगकर्मींना आहे.

तुलनेत मराठी नाटक रंगकर्मींना दोन महिन्यांच्या मेहनतीवर राज्यनाट्य व्यतिरिक्त राज्यात अनेक स्पर्धा, एकांकिकेत सहभाग घेता येतो. परंतु संस्कृत नाटकांसाठी कोणतीच स्पर्धा नसल्याने संस्कृत रंगकर्मींची ससेहोलपट होत आहे. (Apart from Sanskrit state drama competition there is no competition in Maharashtra of sanskrit drama nashik news)

संस्कृत नाटकांना उभारी मिळावी, यासाठी नाशिकमधील जवळपास आठ संस्था प्रयत्नशील आहेत. चैतन्य गायधनी, तन्मय भोळे, डॉ. लीना हुन्नरीकर, ऋचिता पंचभाई, निखिल जगताप आदी संस्कृत नाटकाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गत दहा वर्षांपासून कार्यरत असून, वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले आहेत.

एचपीटी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचीही साथ त्यांना मिळत आहे. संस्कृत नाटकांच्या विविध स्पर्धा व्हाव्यात, संस्कृत नाट्य स्पर्धेतून राज्यात नाशिकची वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा नाशिकमधील संस्था करीत आहेत. परंतु त्यास अद्याप यश आलेले नाही. शासन, तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने कलाकारांची कोंडी होत आहे.

मराठी एकांकिका संस्कृतमध्ये अनुवादित

संस्कृत नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत प्रतिसाद मिळत असला तरी त्याच नाटकाचा प्रयोग पुन्हा करायचा झाल्यास कलाकारांना आर्थिक पाठबळ मिळत नाही. राज्यनाट्य स्पर्धेत अनुवादक, वाचिक दिग्दर्शकांची मेहनत जास्त असते; परंतु त्यांना बक्षीस मिळत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drama
Sanskrit Topper: 13 हजार विद्यार्थ्यांना मागे टाकून मुस्लीम विद्यार्थी बनला संस्कृतचा टॉपर

प्रयोगानंतर सेन्सॉर प्रमाणपत्र नाटकास न मिळाल्यास बक्षिसास ते नाटक पात्र ठरत नसल्याची स्थिती आहे. तसेच, संस्कृत नाटक टिकले पाहिजे, ही भावना कलाकारांमध्ये असली तरी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वेळेत सेन्सॉर प्रमाणपत्र मिळावे

संस्कृत नाटकास सेन्सॉर प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याची खंत कलाकारांनी व्यक्त केली. फेब्रुवारीत झालेल्या स्पर्धेतील नाटकाचे १५ दिवसांआधी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याची शाश्वत कालावधी असावा, शासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आहे.

"संस्कृत नाटकांच्या स्पर्धा होतच नाही. गत दहा वर्षांत संस्कृत रंगभूमीसाठी काम करतोय. नाटक वाढण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहोत. सांस्कृतिक धोरणात संस्कृत नाटकांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी विचार व्हावा." - चैतन्य गायधनी, लेखक-दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार

"संस्कृत नाटक पूर्णवेळ करणे अवघड आहे. संस्कृत नाटकांना रंगकर्मी मेहनत घेतात; परंतु अनुदान सोडाच मंच मिळत नसल्याची अडचणी निर्माण होतात. संस्कृत रंगभूमीची सेवा करायची आहे, मात्र पाठबळ मिळत नाही." - तन्मय भोळे, लेखक-दिग्दर्शक

Drama
Shree Gajanan Shegavi Drama : लंडनमध्ये ‘श्री गजानन शेगावीचे’ हाऊसफुल्ल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com