Nashik News : पाण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत : शिंदे

Irrigation for farming
Irrigation for farmingesakal

नाशिक : नाशिक पाटबंधारे (Irrigation) विभागातर्फे कार्यक्षेत्रातील प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी आणि पाणीवापर संस्थांनी पाण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज जवळच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत.

नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी ही माहिती दिली. (Application for water should be submitted by February 25 Executive Engineer of Nashik Irrigation Department gave information nashik news)

कार्यक्षेत्रात नाशिक डावा तट कालवा, गोदावरी उजवा व डावा तट कालवा, आळंदी डावा व उजवा तट कालवा, पालखेड उजवा तट कालवा आदी लाभक्षेत्र तसेच वालदेवी, मुकणे, भावली, दारणा, वाकी, भाम, गंगापूर, कडवा, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांचे जलाशय यासह कडवा, दारणा, गोदावरी नदीचा भाग आणि गोदावरी नदीवरील या विभागाच्या अधिपत्याखाली एकूण ९ कोल्हापूर बंधारेंचा समावेश आहे.

सरकारच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळी हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती आणि औद्योगिक कारखान्यांना पुरवण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Irrigation for farming
NMC News : ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

धरणातील पाणी हे लाभक्षेत्रातील बारामाही उभ्या पिकांना रब्बी हंगामाअखेर पाणीपुरवठा सुलभ होण्यासाठी मंजूर क्षेत्रात उभ्या पिकांना पाणी घेताना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे. सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा.

ज्या कालव्यांवर अथवा चारीवर नमुना क्रमांक ७ च्या प्रवर्गातील मागणी उपलब्धतेपेक्षा अधिक असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा, उपविभागस्तरावर सम प्रमाणात कपात करून विहित अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात येणार आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले.

Irrigation for farming
Circus : कोरोनापूर्वी देशात होत्‍या 100 अन् आता उरल्‍या अवघ्या 5 सर्कस!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com