esakal | परमबिरसिंग आरोप-प्रत्यारोप चौकशीसाठी मालेगावचे ॲड.शिशिर हिरेंची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

shishir hiray

परमबिरसिंग आरोप-प्रत्यारोप चौकशीसाठी मालेगावचे ॲड.शिशिर हिरेंची नियुक्ती

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) व मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांच्यातील आरोप प्रत्यारोप चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे (mumbai high court) सेवानिवृत्त न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल उच्चधिकार समितीचे वकील म्हणून येथील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार राज्य शासनाने ही नियुक्ती केली आहे. (Appointed Shishir Hiray as Advocate of Committee)

परमबिरसिंग यांच्या आरोपांसाठी उच्चाधिकार चौकशी

देशमुख व सिंह यांच्यातील आरोप प्रत्यारोप प्रकरणाचा संबंध सचिन वाजे मनसुख हिरण प्रकरणाशी आहे. राज्यासह देशाचे लक्ष वेधुन घेणाऱ्या अंटेलिया या प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणापासून सुरू झालेल्या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. त्यातच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक मागणीचे, खंडणीचे आरोप केले. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल उच्चधिकार समिती गठीत केली आहे. या समितीत शासनाने विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांची चौकशी समितीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा: लॉकडाउनच्या घोषणेनंतर नाशिककरांची बाजारपेठेत तोबा गर्दी; पाहा VIDEO

विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरेंची नियुक्ती

सोमवारी सायंकाळी शासनाने चौकशी समितीचे अधिकारी व समितीच्या वकिलांची घोषणा केली. समितीस चौकशी आयोग कायदा 1952 यानुसार उपलब्ध असणारे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. उच्चाधिकार समिती त्या अंतर्गत असलेले सर्व अधिकार वापरू शकते. या समितीला 6 महिन्यात अहवाल सादर करावयाचा असून समितीचे कामकाज मुंबई येथे होईल. हिरे यांची यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. हिरे यांच्या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: ''मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"

loading image