NMC News : महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती?

Nashik Municipal Corporation News
Nashik Municipal Corporation Newsesakal

Nashik News : राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (ता.५) नाशिक महापालिकेचा पदभार सोडला.

त्यांच्या रिक्त जागेचा प्रभारी कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे असून, आयुक्तपदासाठी नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नावाची चर्चा आहे. (appointed as Nashik Municipal Commissioner Manisha Khatri Dr. Discussion of name of Avinash Dhakne Nashik News)

महापालिकेचे नियमित आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार मागील महिन्यात मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून ते नियमित आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यास त्यापूर्वीच राज्य शासनाने त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यामुळे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तात्पुरता आयुक्त पदाचा पदभार आहे.

नाशिकच्या आयुक्तपदी विराजमान होण्यासाठी अनेकजण फील्डिंग लावतात. आयुक्त पुलकुंडवार यांच्याकडून पदभार काढून घेताना त्यांच्या जागी शासनाने अद्याप नियुक्ती का दिली नाही, हे मोठे कोडे निर्माण झाले आहे.

Nashik Municipal Corporation News
Nashik Maize Rate News : मक्याच्या बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा; जिल्ह्यात यंदा मुख्य पीक ठरणार मका

दरम्यान आयुक्त पुलकुंडवार यांच्या रायगड बंगल्यावर सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आयुक्तांनीदेखील तेवढ्याच नम्रपणे शुभेच्छा स्वीकारल्या. मंगळवारी (ता. ६) साखर आयुक्त पदाचा पदभार स्वीकारतील.

दरम्यान, आयुक्त पदाच्या स्पर्धेत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री व फिल्मसिटी संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

कामगार खात्याचे संचालक करंजकर तसेच सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यादेखील नावाची चर्चा होती. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या गुड बुकमध्ये असलेल्या मनीषा खत्री यांच्याकडे पदभार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Municipal Corporation News
Nashik News : गुणवान कलावंतांना Home Town वर वाव; नाशिकमध्ये 4 मालिकांसह 2 चित्रपटांचे चित्रीकरण

साताळकर अडकले की अडकवले?

लक्ष्मीकांत साताळकर यांची महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे प्रशासन उपयुक्त पदाचा पदभार दिला जाईल.

मात्र, मनोज घोडे- पाटील यांच्याकडून अद्यापही पदभार काढला गेला नाही व साताळकरदेखील तो पदभार स्वीकारण्यासाठी अद्यापपर्यंत आलेले नाहीत. पदोन्नती प्रकरण मार्गी लावण्यासाठी साताळकर यांना आहे त्याच जागेवर काही काळासाठी अडकविण्यात आल्याची चर्चा आहे.

Nashik Municipal Corporation News
Nashik Crime: सोनसाखळी चोरट्यांचे सत्र थांबेना; भरदिवसा 2 महिलांचे सौभाग्याचे लेणे खेचले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com