Nashik News : कमी खर्चात एकरी निघणारे चांगले उत्पन्न आणि बाजारभावाची हमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी दोन रुपये देणारे मका हक्काचे पीक बनले आहे. याचमुळे वर्षागणिक खरिपातील मक्याचे क्षेत्र वाढत असून जिल्ह्यात खरिपाचे मका हे प्रमुख पीक बनत आहे.
किंबहुना खरिपाच्या ३५ ते ३८ टक्के क्षेत्रावर मका घेतला जात असून यंदाही दोन लाख २८ हजार हेक्टरवर मक्याची पेरणी होण्याची शक्यता आहे. (price of maize seeds Increase growing trend of farmers companies moving Maize main crop in district this year sowing will be done on 2 lakh 28 thousand hectares Nashik News)
यासाठी तब्बल १७५ ते १८० कोटी रुपयांचा खर्च बियाण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. अव्वाच्या- सव्वा दरामुळे हा शेतकऱ्यांच्या माथी भुर्दंडच ठरत आहे.
बागायतदारांचा अर्धा अन दुष्काळी अर्धा असलेला जिल्हा कांदा आणि द्राक्षांचा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. आता मक्याचा जिल्हा म्हणूनही नवी ओळख निर्माण होत आहे.
पोल्ट्री व स्टार्च उद्योगासाठी मक्याला मागणी वाढली असल्याने दुष्काळी पट्ट्यातील मालेगाव, येवला, बागलाण, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र मकाखाली गुंतवले जात आहे.
जिल्ह्यात खरिपाची ६ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी होते तर मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १६ हजार ११२ हेक्टर आहे. मागील दोन-तीन वर्षापासून तब्बल २ लाख ३५ हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र मकाच्या पिकाखाली गुंतवले जात आहे. यंदा कृषी विभागाने दोन लाख २८ हजार ३४२ हेक्टरचे पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.मात्र जाणकारांच्या अंदाजानुसार यात वाढत होण्याची शक्यता आहे.
बियाणे खरेदीत मोठा भुर्दंड
जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्टरच्या आसपास म्हणजेच सुमारे पावणेसहा ते सहा लाख एकरावर मक्याची पेरणी होईल.
एक एकरात मका लागवडीला आठ किलो बियाणे म्हणजेच मकाच्या दोन पिशव्या लागतात. जिल्ह्यासाठी सुमारे साडे अकरा ते बारा लाख पिशव्यांची गरज भासणार आहे.
सध्या मक्याच्या बियाण्याच्या चार किलोच्या पिशवीची किंमत १२०० ते १९०० रुपयापर्यंत आहे. म्हणजेच सरासरी पंधराशे रुपये पिशवी गृहीत धरली तरी १७५ ते १८० कोटी रुपये खर्च फक्त मका बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. वाढलेल्या दरामुळे हा शेतकऱ्यांना मोठा भुर्दंडच मनाला जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
क्विंटलला दोन तर बियाण्याला ४० हजार!
मक्याचे बाजारभाव आणि बियाण्याचे भाव यातील तफावत विचारात धरली तर हास्यास्पद आहे. चार किलोच्या पिशवीला सरासरी पंधराशे ते सोळाशे रुपये लागतात. म्हणजेच प्रति किलोला बियाण्याला चारशे रुपये खर्च येतो.
या हिशेबाने बियाण्यांसाठी क्विंटलला ४० हजार रुपये खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांना येते. त्याचवेळी शेतातून पिकविलेल्या मक्याचा दर मात्र प्रतिक्विंटलला दोन हजार रुपये आहे. ही तफावत का व कशी याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.
मका कंपन्यांना बियाणे उत्पादनासाठी खरोखर इतका खर्च येतो का? हा ही संशोधनाचा विषय बनला आहे. एकीकडे मका पिशवीवर एमआरपी दोन हजारांच्या आसपास टाकलेली असते आणि पिशवी मात्र बाराशे ते पंधराशे रुपयाला विक्री केली जाते, यामागचेही गणितही कोड्यात टाकणारे आहे. त्यामुळे शासनाने बियाणे दर ठरवण्यासाठी धोरण ठरवण्याची गरज आहे.
“केवळ मक्याच्या बियाण्याची उलाढाल १७५ कोटीच्या घरात गेल्याचे पाहून सखेद आश्चर्य वाटते. खरे तर कंपन्यांनी अगोदरच भरमसाठ किमती वाढविल्या आहे. बियाणे कंपन्यांना क्विंटलसाठी खरंच इतका खर्च येतो का? की ते चाळीस हजार रुपये क़्विटलप्रमाणे शेतकऱ्यांकडून दर घेतात. शासनाने व कृषी विभागाने बियाण्यांच्या दराचे धोरण ठरवून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबविण्याची गरज आहे.
- अशोक कुळधर, कृषी अभ्यासक, सायगाव
अशी होते पेरणी..
- खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
- रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
- उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
जिल्ह्यातील मका क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका - सरासरी – पेरणी (२०२१-२२मधील)
येवला - ३०४७२ - ४०५५७
मालेगाव - ३३५४९ - ४४७३३
सटाणा - ३४८५९ - ३६६९२
कळवण - १८१११ - १७४३७
देवळा - १४२८१ - १७०४९
नांदगाव - २७१०० - ३१८४०
नाशिक - १३८८ - ४७१
दिंडोरी - २१०३ - ९१९
निफाड - १३९८४ - ११२१८
सिन्नर - १३६८३ - १४८७७
चांदवड - १९७३३ - १८५९०
एकूण - २०९४९७ – २३४४७०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.