Malgegaon : महापालिकेवर 13 जूनपासून आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

Bhalchandra Gosavi & MMC
Bhalchandra Gosavi & MMCesakal

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेतील (Municipal Corporation) सत्तारूढ नगरसेवकांचा (Corporators) कार्यकाळ १५ जूनला संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Self Government Institutions Elections) विहित वेळेत होणार नसल्याने संबंधित संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मालेगाव महापालिकेवर १३ जूनपासून प्रशासक नियुक्त होणार आहेत. आयुक्त भालचंद्र गोसावी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी याबाबत महापालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. (Appointment of MMC commissioner Bhalchandra gosavi as Administrator from 13th June in malgaon Nashik News)

महापालिकेची २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेस-शिवसेना आघाडीचे रशीद शेख १५ जूनला महापौरपदी विराजमान झाले होते. अडीच वर्षे त्यांनी कार्यकाळ सांभाळल्यानंतर त्यांच्या पत्नी ताहेरा शेख महापौर झाल्या. कॉंग्रेस-शिवसेनेला भाजपनेही बाहेरून पाठिंबा दिला होता. पहिले अडीच वर्षांच्या कार्यकाळात समवेत असलेले एमआयएमचे नगरसेवक मात्र विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसपासून दुरावले. आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन आघाडीने विरोधकाची भूमिका पार पाडली. त्यांना फारसा प्रभाव दाखविता आला नाही. महागठबंधन आघाडीत कमी नगरसेवक असूनही जनता दलाचेच वर्चस्व राहिले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात अखेरच्या टप्प्यात महापौर ताहेरा शेख यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग मालेगाव महापालिकेत २०१७ लाच झाला. विद्यमान नगरसेवकांचे पाच दिवस शिल्लक आहेत. १३ जूनला श्री. गोसावी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारतील.

Bhalchandra Gosavi & MMC
राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच; MIMच्या भूमिकेबाबत उत्सुकता

नव्याने महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना झाली असून, निवडणूक आयोगाला प्रभागरचना सादर करण्यात आली आहे. अद्याप प्रारूप प्रभागरचना जाहीर झालेली नाही. येत्या आठवड्यातच प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यामुळे निवडणुका मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाकडेही नेत्यांचे लक्ष लागून आहे. नाशिक महापालिकेचे आरक्षण ओबीसी आरक्षण वगळून जाहीर झाले आहे. आगामी महापालिका निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे.

Bhalchandra Gosavi & MMC
Nashik : अचानक उसाला लागल्याने शेतकऱ्याचे झाले आर्थिक नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com