राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच; MIMच्या भूमिकेबाबत उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse & mufti muhammad ismail

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच; MIMच्या भूमिकेबाबत उत्सुकता

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya sabha Elections) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे विविध राजकीय पक्षांच्या (Political Parties) बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व आमदार मुंबईत दाखल झाले असताना विधानसभेत दोन आमदार असलेल्या एमआयएमच्या (MIM) भूमिकेबाबत मोठी उत्सुकता आहे. कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी या संदर्भात येथील एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Rajya Sabha elections Curiosity about role of MIM Nashik Political News)

श्री. भुसे यांच्या भेटीनंतर त्यावर मत व्यक्त करताना पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असुदुद्दीन ओवेसी (Asasuddin Owaisi) यांच्या उपस्थितीत नांदेड येथे आज (ता.७) रात्री होणाऱ्या बैठकीत या संदर्भात निर्णय होईल. पक्ष जो निर्णय घेईल तो आपणाला मान्य असेल, असे आमदार मौलाना मुफ्ती यांनी सांगितले. नांदेड येथे विवाह समारंभासाठी खासदार ओवेसी येणार आहेत. धुळे येथील आमदार फारुख शाह व येथील आमदार मौलाना मुफ्ती या दोघांची मते महाविकास आघाडीला मिळावी यासाठी जोरदार व्यूहरचना सुरु आहे. दोघेजण भाजपला मतदान करण्याची सुतराम शक्यता नाही. तथापि आघाडी सरकार साकार झाले असताना दोघा आमदारांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा: देशात 50 अन् राज्यात 71 टक्के घरांमध्ये नळ कनेक्शन

त्याचवेळी भाजप विरोधी सरकार सत्तेवर आले त्याचा आनंद आहे. आगामी काळात काही सहकार्य लाभल्यास व प्रत्यक्ष मतदानात सहभागी व्हावे लागल्यास आघाडीला सहकार्य करू असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्याचे स्मरणही आमदार मौलाना मुफ्ती यांनी करून दिले. यानंतरही पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी आपण सहमत असू असे ते म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी सुरक्षित ४४ व किमान ४२ मतांचा कोटा आवश्‍यक आहे. शिवसेनेने खासदार संजय राऊत व शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार या दोघा उमेदवारांच्या विजयासाठी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. भुसे यांनी मौलाना मुफ्ती यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा: रोबोटद्वारे ड्रेनेजलाइनची स्वच्छता; शहराच्या विविध भागात प्रात्यक्षिक

Web Title: Rajya Sabha Elections Curiosity About Role Of Mim Nashik Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top