Nashik: जलजीवनचा आराखडा नाबार्ड मार्फत नव्याने बनवणार; वावी येथील योजनेचे काम निकृष्ट असल्याची प्रशासनाची कबुली

येत्या काळात नाबार्ड मार्फत फेर आराखडा बनवून त्यानुसार पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
Aquaculture plan to be revised through NABARD administration admits work of scheme at Vavi poor
Aquaculture plan to be revised through NABARD administration admits work of scheme at Vavi pooresakal

वावी : जलजीवन मिशन अंतर्गत सिन्नर तालुक्यातील वावी येथे सुरू असलेले काम निकृष्ट असल्याच्या ग्रामस्थांच्या आरोपाला पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीच पुष्टी दिली आहे. योजनेचे काम मंजूर आराखड्यानुसार झालेली नाही.

त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात आराखडा बनवण्यात न आल्यामुळे येत्या काळात नाबार्ड मार्फत फेर आराखडा बनवून त्यानुसार पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले. (Aquaculture plan to be revised through NABARD administration admits work of scheme at Vavi poor Nashik news)

वावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले जलवाहिन्या टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक वेलजाळी, गणेश वेलजाळी यांचे सह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी केली होती.

मात्र प्रशासकीय पातळीवरून ठेकेदाराला अभय देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्यावर ग्रामस्थांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण आंदोलनास सुरुवात केली. यामुळे धाबे दणाणलेल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने वावी येथे धाव घेत ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

नाबार्डचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱयांनी पडताळणी केली असता ग्रामस्थांच्या आरोपात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. नियमाप्रमाणे किमान एक मीटर खोल खोदकाम करून समतल जलवाहिनी टाकण्याचे योजनेत नमूद आहे.

मात्र अशा प्रकारचे काम कुठेही झाले नसल्याचे आढळून आले. अर्ध्या मीटर खोलीपर्यंत देखील जलवाहिन्या टाकण्यात आल्या नव्हत्या. अनेक ठिकाणी तर उघड्यावरच जलवाहिन्या दिसत होत्या. त्यामुळे सदर काम नियमबाह्य व निकृष्ट होत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मयूर बिब्बे यांनी नाबार्ड मार्फत वावी गावासाठीचा सुधारित आराखडा बनवण्यात येईल.

कारण या अगोदर ग्रामपंचायत मार्फत सादर आराखड्यात अधिक संख्येने लोक राहणाऱ्या वस्त्या समाविष्ट नाहीत. मीठ सागरे रस्त्यावरील ताजने मळा, निंबोणीचा मळा, माडीचा मळा या भागासह प्रत्येक कुटुंबापर्यंत नळाचे पाणी पुरवण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

जलजीवन मिशनच्या जिल्हास्तरीय यंत्रणेने ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या कामाची चौकशी करावी, त्याला दिलेले देयक वसूल करावे, शासनाची व जनतेची फसवणूक केली म्हणून त्यास काळे अधिक टाकावे, सुधारित आराखडा बनवून त्यानुसार मंजूर नकाशाची प्रसिद्धी फ्लेक्स द्वारे करावी या मागण्या वावी येथील आंदोलकांच्या आहेत.

या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. राकेश आनप, गणेश थोरात, किरण संधान, सुरेश ताजणे, राहुल वेलजाळी, नितीन आनप, अमोल पठाडे, विजय लांडगे, साईनाथ पठाडे, नितीन काळोखे, अनिल आनप, अरुण ताजने, नितीन घेगडमल आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

"जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाने शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे वावी ग्रामपंचायत स्तरावर आराखड्यात असंख्य चुका आहेत. केवळ एका कुटुंबासाठी नियमबाह्य एक किलोमीटर अंतराची वाहिनी टाकण्यात आली तर दुसरीकडे दहा दहा घरांचा समुदाय असणाऱ्या वस्त्या मात्र दुर्लक्षित ठेवण्यात आल्या. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने झालेली कामे रद्द करावीत. गावातील प्रत्येक घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय यंत्रणेची आहे. जोपर्यंत नवा आराखडा प्रसिद्ध केला जात नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही."- गणेश वेलजाळी ( ग्रामस्थ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com