esakal | नाशिक : लष्कर भरती रॅकेटचा पदार्फाश! बोगस संस्थेच्या नावाने गैरप्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

army recruitment

नाशिक : लष्कर भरती रॅकेटचा गुन्हे शाखेच्या मदतीने पदार्फाश!

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : लष्करात (army recruitmrnt) भरतीचा प्रकार बोगस प्रकार उघडकीस आला आहे. यात लष्करी प्रशासनाने नगर गुन्हे शाखेच्या मदतीने सहा जणांच्या रॅकेटचा (racket exposed) पदार्फाश केला. यात दोघे नाशिकचे आहेत. नेमका प्रकार काय?

सहा जणांच्या रॅकेटचा पदार्फाश

नाशिक रोड तोफखाना केंद्रात लष्कर भरतीत बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांना भरती केली जात असल्याची माहीती मिळाल्यावरुन तोफखाना केंद्रातील गुप्तचर विभागाने नगर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा भांडाफोड केला. मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२ जांभळी पाथर्डी), दत्तू नवनाथ गर्जे (वय ४०,अकोला पाथर्डी) कुंडलिंक दगडू जायभाये (अनपटवाडी ता.पाटोदा जि.बीड), मच्छिंद्र कदम मानूर ता.शिरुर कासार जि.बीड), अजय उर्फ जय रामराम टिळे (वाडीवऱ्हे ता.इगतपुरी) शांताराम पंढरीनाथ अनार्थे (पिंपळद, जि.नाशिक) अशा सहा जणांचा समावेश आहे. लष्कर भरतीत मुलांचे वय कमी दाखवून त्यासाठी बोगस प्रमाणपत्र मिळवून देत लष्करात भरती केली जाते. अशी माहीती मिळाल्यावरुन लष्करी यंत्रणा काही दिवसांपासून या प्रकरणावर पाळत ठेउन होती.

हेही वाचा: पोटच्या जुळ्या चिमुकल्यांना बापाने ढकलले खाणीत; दुर्दैवी घटना

वय कमी करुन लष्कर भरती

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांचे वय कमी करुन लष्करात भरतीचा प्रकार उघडकीस आला आहे. यात लष्करी प्रशासनाने नगर गुन्हे शाखेच्या मदतीने बनावट कागदपत्र सादर करुन भरती करणाऱ्यां सहा जणांचे रॅकेटचा पदार्फाश केला. यात दोघे नाशिकचे आहेत. मुलांच्या दाखल्यावर वय कमी करुन लष्करात भरती करण्याच्या प्रकरणाच्या चौकशीत (पाथर्डी जि.नगर) येथे रॅकेट असल्याचे पुढे आले.बनावट संस्थेच्या नावाने दाखले देणाऱ्या रॅकेटकडून काही लोकाकडून ३५ हजार रुपये घेऊन मुलांना इयत्ता दहावीच्या वर्गात बाह्य विद्यार्थी म्हणून प्रवेश करुन देत, त्यानंतर दहवीच्या निकालात त्यांचे वय कमी करून मिळते.त्या निकालाच्या आधारे जास्त वयाची मुले कमी वयाची बनून आर्मी मध्ये भरती होत आहे.

हेही वाचा: जायकवाडीचे पाणी बिअर उत्पादनासाठी! 'त्या' अटीला जलचिंतनचा आक्षेप

मुद्देमाल हस्तगत

सहा जणांच्या रॅकेटमध्ये नाशिकच्या दोघांचा समावेश आहे. त्यात, अजय उर्फ जय रामराम टिळे (वाडीवऱ्हे ता.इगतपुरी) शांताराम पंढरीनाथ अनार्थे (पिंपळद, जि.नाशिक) यांचाही समावेश आहे. याप्रकरणी गुप्तचर विभागाने पाथर्डी पोलिसांच्या मदतीने दोघां सूत्रधारांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या शाळेचे दाखले, दाखले तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे बनावट स्टॅम्प, संगणक, स्कॅनर मशीन, आधार कार्ड बनवण्याची सामग्री आदीसह साहित्य जप्त केले आहे.

loading image
go to top