esakal | पोटच्या जुळ्या चिमुकल्यांना ढकलले खाणीत; दुर्दैवी बापाची मन हेलावणारी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

पोटच्या जुळ्या चिमुकल्यांना बापाने ढकलले खाणीत; दुर्दैवी घटना

sakal_logo
By
विनोद बेदरकर

ओझर/नाशिक : सैय्यद पिंप्री गावालगत दगडाच्या खाणी आहेत. या खाणींत पाण्याचे डोह असून, सध्या पावसाळ्यामुळे त्यात पाणी साचले आहे. शंकर महाजन हे मोलमजुरी करत. दोन्ही जुळ्या पाल्यांना सोबत घेऊन सायंकाळी सहाच्या सुमारास घरी काहीही न सांगता आपल्या मोटार सायकलवरून निघून गेले होते. त्यानंतर...

हेही वाचा: जायकवाडीचे पाणी बिअर उत्पादनासाठी! 'त्या' अटीला जलचिंतनचा आक्षेप

पोटच्या जुळ्या चिमुकल्यांना बापाने ढकलले खाणीत; दुर्दैवी घटना

शंकर महाजन आपल्या दोन्ही जुळ्या पाल्यांना सोबत घेऊन सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास घरी काहीही न सांगता आपल्या पॅशन मोटार सायकल (एमएच १५, सीयू ६३९७)द्यारे निघून गेले होते. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ओझर- पिंप्री शिवेवरील गट नंबर १६२१मध्ये ग्राम पंचायत हद्दीतील खाणीमधील तलावात या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. सोमवारपासून बेपत्ता असलेला एक मजूर व त्याचा मुलगा आणि मुलगी अशा तिघांचे मृतदेह सैय्यद पिंप्री (ता. नाशिक) येथील दगडाच्या खाणीत बेवारस स्थितीत आढळून आले. या तिघांनी आत्महत्या केल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. याबाबत पोलीस पाटील कैलास ढिकले यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आहिरराव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आंबोरे, कोठावदे, विक्रम कडाळे, जगदीश जाधव, कैलास पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून, स्थानिकांच्या मदतीने तिघांचे शव बाहेर काढण्यात आले. नंतर ते नाशिकला जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले.

हेही वाचा: श्रीलंकेत कांद्यावर आयातशुल्क; भारतीय कांद्याचे वांदे!

तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितले.

भगतसिंगनगर (डांबरवाडी), ओझर येथील शंकर गुलाब महाजन (वय ३४) असे मृत मजूराचे नाव असून, मुलाचे नाव पृथ्वी व मुलीचे नाव प्रगती (दोघांचे वय ३ वर्षे) असे आहे. हे कुटूंब मुळचे यावल (जि. जळगाव) येथील रहिवासी आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास स्थानीक नागरिकांपैकी कुणीतरी या तिघांचे मृतदेह पाण्यावर तंरगताना बघितले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

loading image
go to top