esakal | ज्येष्ठांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून गंडा; CCTV तून लागला छडा

बोलून बातमी शोधा

atm card
ज्येष्ठांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून गंडा; CCTV तून लागला छडा
sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकांकडून (senior citizen) त्यांच्या एटीएम कार्डद्वारे (ATM card) पैसे काढणाऱ्या संशयितास इंदिरानगर पोलिसांनी (indira nagar police station) ताब्यात घेतले. सोमवारी (ता. ३) दुपारी बापू बंगला शाखेच्या एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकांनी एटीएम समोर संशयित इसम फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. ( Arrested for withdrawing money from senior citizens through ATM card)

ज्येष्ठांचे एटीएम कार्ड घेऊन पैसे काढणाऱ्याला अटक

वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी गुन्हे शोध पथकाचे महेश जाधव, मुश्रीफ शेख, सागर परदेशी आणि भगवान शिंदे यांना सूचना देत पाठवले. त्यांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता शैलेश प्रदीप शिंदेगे (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), असे नाव सांगितले. इतर माहिती देण्यास तो टाळाटाळ करू लागल्याने त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील एटीएम मध्ये वयस्कर इसमाकडून एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यांचा एटीएम पिन द्वारे त्यांच्या खात्यावरील पैसे काढून घेण्याची कबुली दिली. तसेच भद्रकाली व मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतदेखील गुन्हा केल्याची कबुली दिली.

.

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट

पोलिस ठाण्याशी संपर्क साधून भद्रकाली पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदरचा इसम स्पष्ट दिसत असल्याने पूर्ण खात्री झाली. भद्रकालीचे उपनिरीक्षक राऊत यांनी संपर्क साधून पुढील कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतले. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला