esakal | #COVID19 : लॉकडाउननंतर मोठ्या प्रमाणात नागरिक नाशिकमध्ये दाखल...प्रशासनाकडून करडी लक्ष!
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1.jpg

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात 48 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तपोवनात उभारला आहे. तर बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांचा ताबा घेतला जाणार आहे.

#COVID19 : लॉकडाउननंतर मोठ्या प्रमाणात नागरिक नाशिकमध्ये दाखल...प्रशासनाकडून करडी लक्ष!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत शहरात 139 नागरिक परदेशातून आल्याचे आढळले असून, त्यात सर्वाधिक आखाती देशातून आले आहेत. महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून आतापर्यंत 33 नागरिकांना घरी सोडण्यात आले. 

दोन दिवसांत नागरिकांची संख्या वाढणार
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात 48 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तपोवनात उभारला आहे. तर बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांचा ताबा घेतला जाणार आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांच्याशी संपर्क साधून तपासणी केली जात आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये लॉकडाउन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. दोन दिवसांत नागरिकांची संख्या वाढणार असल्याने त्यांच्यावरही लक्ष ठेवले जात आहे. 

कोरोना सर्वेक्षणाची माहिती अशी... 
- कोरोनाग्रस्त देशातून आलेले नाशिक शहरात आढळलेले नागरिक ः 139 
- पंधरा दिवसांचे सर्वेक्षण केलेले नागरिक ः 12 
- सर्वेक्षणाखालील नागरिक ः 127 
- आजपर्यंत रुग्णालयात दाखल ः 36 
- पॉझिटिव्ह रिपोर्ट ः 0 
- निगेटिव्ह रिपोर्ट ः 33 
- आजपर्यंत घरी सोडलेले रुग्ण ः 33 

कोरोनाग्रस्त देशातून आलेले नागरिक 
यूएई ः 46 
इटली ः 5 
जर्मनी ः 7 
चीन ः 2 
यूएसए ः 11 
यूके ः 9 
इतर ः 59 
--------------- 
एकूण ः139 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

विलगीकरण कक्षातून 33 जणांना सोडले घरी या क्रमांकावर कळवा माहिती 
टोल फ्री नंबर : 104 
जिल्हा रुग्णालय नाशिक- 0253-2572038, 2576106 
जिल्हा साथरोग कक्ष- 9823505085, 788335085 
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय- 0253-2590049  

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

loading image