esakal | वाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्या! आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे विधानसभा उपाध्यक्षांना साकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

zirwal 123.jpg

कोरोना या जागतिक महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा, गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या वाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्यावा, यासाठी संघटनेतर्फे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना साकडे घालण्यात आले. 

वाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्या! आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे विधानसभा उपाध्यक्षांना साकडे 

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : कोरोना या जागतिक महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा, गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या वाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्यावा, यासाठी संघटनेतर्फे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना साकडे घालण्यात आले. 

मानधन जुलैपासून प्रलंबित
राज्यात कार्यरत आशा व गटप्रवर्तक यांनी कोरोना महामारीच्या काळात फ्रन्टफायटर, योध्दा म्हणुन जी भुमिका निभावून जे काम केले ते उल्लेखनिय आहे. परंतु यापरिस्थित राज्य सरकारने आशांसाठी मंजूर केलेले दोन हजार रूपये व गट प्रवर्तकांना मंजूर केलेले तीन हजार रूपये मानधन अद्यापही दिलेले नाही, याकडे संघटनेने झिरवाळ यांचे लक्ष वेधले आहे. हे वाढीव मानधन जुलैपासून प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

दिपावली बोनसही मिळावा
याशिवाय कोरोनाच्या संकट काळात आशा व गटप्रवर्तक यांनी स्वतःच्या कुटुंबाची, मुलाबाळांची व घरातील व्यक्तींचा विचार न करता, स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना फ्रन्टफायटर म्हणुन काम केले, अशा कोरोना योध्य्या आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकार कडुन दिपावली बोनसही मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

झिरवाळ मुख्यमंत्र्यांची भेट घेत करणार चर्चा
यावेळी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेचे नाशिक व नंदुरबार जिल्हा संघटक विजय दराडे, राज्य सचिव मायाताई घोलप, अलका भोये, हिरा गायकवाड, सुनिता सुरकुटे, पुष्पा जाधव, बेबी धात्रक, लता गायकवाड, ज्योती जाधव यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. निवेदन स्विकारल्यावर ना. झिरवाळ यांनी याप्रश्‍नी येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत वाढीवर मानधनासह दिवाळी बोनस संदर्भात चर्चा करू, असे सांगितले. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

अन्यथा काळी दिवाळी साजरी करू 
राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन वाढीव मानधन व बोनस चा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आमदारांच्या घरी जाऊन काळी दीपावली साजरी करू व तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी दिला आहे आहे. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा व गट प्रवर्तकांना शासनाने वा-यावर सोडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. 

loading image