Ashadhi Ekadashi 2023 : शहरात विठुनामाचा गजर! भाविकांच्या वर्दळीने फुलली विठ्ठल मंदिरे

Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023esakal

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीचे औचित्य साधत गुरुवारी (ता. २९) शहरातील विठ्ठल मंदिरांत विठुनामाचा गजर झाला. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल मंदिरे फुलली होती.

सोशल मीडियावरही तरुणांकडून विठुभक्तीची अनुभूती अनुभवण्यास मिळाली. एकादशीचे औचित्य साधत श्रीराम, कपालेश्‍वर आदी छोट्या- मोठ्या मंदिरांतही दर्शनासाठी मोठी गर्दी होती. (ashadhi ekadashi 2023 celebrated with great enthusiasm nashik news)

भाविकांच्या गर्दीने विठ्ठल मंदिरे फुलली
भाविकांच्या गर्दीने विठ्ठल मंदिरे फुललीesakal

दरम्यान एकादशी व बकरी ईद एकत्र आल्याने हिंदू मुस्लिम नागरिकांकडून एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. विठ्ठल मंदिरांसह श्री काळाराम, कपालेश्‍वर आदी लहान मोठ्या मंदिरांतही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

एकादशीचे औचित्य साधत सकाळपासून सोशल मीडियावर विठ्ठल गीते, अभंग, व्हिडिओसह ‘एकादशी दुप्पट खाशी’ असे मजेशीर मेजेसही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. जुन्या नाशिकमधील प्राचीन श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी सात वाजता श्रींची संगीतमय काकडा आरती झाल्यावर अतुल मानकर यांच्या हस्ते अभिषेक झाला. दुपारी महिलांचे भजन तर सायंकाळी पाच वाजता सामुहिक हरिपाठ पठण झाले. सायंकाळी झालेल्या महाआरतीत अध्यक्ष अरुण नेवासकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Wari 2023: वेढा वेढा रे पंढरी! मोर्चे लावा भीमातिरी! वाखरीत दिंड्या विसावल्या

कॉलेज रोडवरील नामदेव विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. संजीव तुपसाखरे यांच्या हस्ते सकाळी सपत्निक पूजन झाले. या ठिकाणी भाविकांना खिचडी, केळी व राजगिऱ्याच्या लाडूंचे वाटप करण्यात आले. उत्सवाचे हे ४६ वे वर्ष होते. हिरालाल लेन येथील श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळातर्फे आषाढीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर स्वरांजली, श्रीराम भजनी मंडळाची भजने झाली. साडेअकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी दुर्गा, श्रीराम भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडल्यावर सायंकाळी अमोल पाळेकर यांचा ‘माझे माहेर पंढरी’ हा भाव-भक्तिगीतांच्या कार्यक्रम झाला.

शाळांमध्ये भरला भक्तीचा मेळा

आषाढी एकादशीची सुटी असल्याने शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वारीचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील चिमुरडे लक्ष वेधून घेत होते. विविध शाळांमध्ये दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पालकांकडून लाडक्या चिमुरड्यांच्या फोटोसेशनसाठीही लगबग सुरू होती. शाळांमध्ये आकर्षक रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या होत्या.

Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023 : एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com