Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त मनमाड आगारातर्फे रोज बसेस

Bus News
Bus Newsesakal

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूरायाच्या भक्तांसाठी मनमाड शहरातून दररोज दोन विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.

तर भाविकांसाठी विठूरायाचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी ४० अथवा त्यावर प्रवासी असेल तर थेट गावातूनच बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक ए. एन. चौधरी यांनी सांगितले. (Ashadhi Ekadashi daily buses are run by Manmad city nashik news)

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मनमाड शहरातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी हजारो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जातात, तर हजारो भाविक एसटी बसने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.

एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दरवर्षी महामंडळाकडून विशेष बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही या यात्रेसाठी मनमाड आगारातून विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज विशेष दोन बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. बुधवारी (ता.२१) या गाड्यांचा शुभारंभ करण्यात आला.

मनमाड येथून पंढरपूर बसची वेळ सकाळी ७:३० ला तसेच दुपारी ३:३० ला असणार आहे. तसेच भाविकांचे विठूमाऊलीचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मनमाड आगारामार्फत ज्या गावातून थेट पंढरपूरसाठी ४० किंवा अधिक प्रवासी असतील त्यांच्यासाठी थेट गावातूनच बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bus News
Ashadhi Ekadashi News : पंढरपूरसाठी आषाढी स्पेशल रेल्वे

तसेच महामंडळाच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ५० टक्के सवलतीचा, ६५ तर ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीचा व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन महामंडळास सेवेची संधी देण्यात यावी असे आवाहन आगार व्यवस्थापक ए. एन. चौधरी यांनी केले.

जादा बसेस पुढीलप्रमाणे

सप्तमी - १

अष्टमी - ४

नवमी -२

दशमी - ६

एकादशी - ५

द्वादशी - १

त्रयोदशी - १

चतुर्दशी - १

"पंढरपूर यात्रेसाठी मनमाड आगारातून दररोज विशेष दोन गाड्या सोडल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात बदलही होऊ शकतात. यात्रेसाठी बुधवार पासून या विशेष बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत." - ए. एन. चौधरी, आगार व्यवस्थापक, मनमाड

Bus News
Ashadhi Ekadashi 2023 : पंढरपूर वारीसाठी 135 जादा बस; सर्व आगारांमधून या तारखेपासून सुटणार बस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com