

Ashok Kharat Case Update
esakal
Ashok Kharat Case: अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणारा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक कुमार एकनाथ खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. नाशिक क्राईम ब्रांचने १८ मार्चला त्याला अटक केली असून, आज २४ मार्च रोजी त्याची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी २ वाजता सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून कोठडी वाढीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ गुन्हे दाखल झाले असून, विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.