गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यात कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. नाशिकच्या सत्र न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी झाली. खरातच्या पोलीस कोठडीला त्याच्या वकिलांनी विरोध केला.
Ashok Kharat Case

Ashok Kharat

sakal

Updated on

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यातील तपासासाठी कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी देऊ नये यासाठी खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र तपास अधिकाऱ्यांनी खरातकडून चौकशीत सहकार्य केलं जात नसल्याचं सांगत पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचे आरोप खरातवर आहेत. तसंच त्याने बाजारातले चिंचोके पॉलिश करून लाखो रुपयांना विकले. त्याच्या कार्यालयात २२ रुद्राक्ष, भिंग याच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.कोर्टात न्यायाधीशांनी अशोक खरातला तुम्हाला काही सांगायचंय का असं विचारलं. त्यावर अशोक खरातने नाही म्हणत हात जोडले. Kharat gets five day police custody defence challenges complaint in court

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com