ashok stambh.jpg
ashok stambh.jpg

स्मार्ट चौकात वाहतूक बेटाऐवजी पिंप! 

नाशिक : अशोक स्तंभ चौकाचे स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. 
प्रजासत्ताक दिनापासून चौक वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही अशोक स्तंभाकडून घारपुरे घाटाकडे जाणाऱ्या रस्ता खोदून ठेवल्याने वाहतुकीसाठी बंदच आहेत. परिणामी वाहनचालकांचा मनस्ताप अजूनही कायम आहे. 

अद्यापही स्मार्ट रोडचे काम सुरूच

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत अडीच-तीन वर्षांपासून त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या रस्त्याचे काम सुरू होते. दुसरीकडे स्मार्ट चौकासाठी तीन महिने बंद ठेवल्यानंतरही अशोक स्तंभ चौकात "स्मार्ट' वाहतूक बेटाऐवजी पिंप ठेवण्यात आले आहेत. टप्प्या टप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली, तर 26 जानेवारीपासून स्मार्ट रोड पूर्णत्वास आल्याचे जाहीर केले गेले. प्रत्यक्षात अद्यापही स्मार्ट रोडचे काम सुरूच आहे. एवढेच नव्हे, तर अवघ्या तीन आठवड्यांसाठी अशोक स्तंभ चौकाच्या सुशोभीकरणासाठी हा चौक बंद करण्यात आला. 

कामकाजाच्या दिरंगाईमुळे अनेकांच्या व्यावसायावरही परिणाम

साधारणत: तीन महिने चौकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान, चौकातील वाहतूक बेट हटविण्यात येऊन त्याजागी नव्याने काहीतरी आकर्षक होणार, याकडे नाशिककरांचे लक्ष होते. परंतु, 26 जानेवारीला अशोक स्तंभ चौक खुला करण्यात आला. तेव्हा वाहतूक बेटाच्या जागेवर चार पिंप ठेवण्यात आलेले पाहून नागरिक नाराज झाले. तसेच, चौकाचे काम करताना घारपुरे घाटही बंद ठेवण्यात आला होता. 
तो अद्यापही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. अशोक स्तंभाकडून रामवाडीकडे जाण्यासाठीचा घारपुरे घाट रस्ता खोदून ठेवला आहे. स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत कामकाजाच्या दिरंगाईमुळे अनेकांच्या व्यावसायावरही परिणाम होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com