Tribal school protest Maharashtra
Sakal
नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांतील बाह्यस्रोत भरतीविरोधात ठराव घेऊन राज्यपालांकडे गेलेल्या बिऱ्हाड आंदोलकांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्यपालांनी त्यांच्या मागण्या फेटाळल्याने आंदोलकांनी मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चा पुन्हा आदिवासी विकास विभागासमोर आणला. राज्यात आता आचारसंहिता लागू झाल्याने धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नसल्याने हा प्रश्न सुटणार तरी केव्हा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.