
नाशिक : येथील आयटी अभियंता जीवन जाधव यांनी आठ दिवस मेहनत घेत पेन्सिलच्या लीडवर अष्टविनायक साकारले आहेत. पेन्सिल लीड कार्विंगची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्याद्वारे सूक्ष्म मूर्ती बनविणारा कलावंत म्हणून जीवनला ओळख मिळाली.
पेन्सिलची लहानपणापासून घट्ट मैत्री होते.
पण पेन्सिल लेखनाचे काम करत नाही हे जीवनने कलेद्वारे सिद्ध केले. जीवनने कलेचे कोणते शिक्षण न घेता केवळ नवीन शिकण्याच्या जिद्दीने पेन्सिल लीड कार्विंग करण्यास सुरवात केली. पेन्सिलच्या टोकावरील लीडवर महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, बाहुबली, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, लाल बागचा राजा यांच्या प्रतिकृतीच्या अनेक कलाकृती बारीक सूक्ष्म कलेने साकारल्या आहेत.
पेन्सिल लीडवरील बाप्पाच्या दर्शनासाठी दुर्बिणीचा अथवा मायक्रोस्कोपचा आधार घ्यावा लागतो. शंभरहून अधिक प्रकारच्या कलाकृती त्याने कोरल्या आहेत. (Ashtavinayak sculpture on pencil lead by engineer jeevan jadhav Nashik Latest Marathi News)
एका पेन्सीलवरील कलाकृती साकारण्यासाठी त्याला पाच ते चोवीस चोवीस तास लागतात. आठ दिवस मेहनत करून जीवनने बाप्पा साकारले. त्याने पेन्सिलबरोबर खडूवर कोरून सुंदर प्रतिकृती बनवल्या आहेत. एका पेन्सिलवर साकारलेल्या ए टू झेड ही २६ अक्षरे हे त्याचे एक ‘रेकॉर्ड' आहे. निसर्ग, पक्षी हे त्याचे आवडते विषय आहेत.
अभिनेते नाना पाटेकर हे नाशिकमध्ये आले असता त्यांना त्याने त्यांचे काढलेले पोट्रेट भेट दिले होते. फेसबुकच्या स्पर्धेत त्याला पारितोषिक मिळाले आहे. कलाकृती साकारण्यासाठी त्याला चित्रकार प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत, त्यांची आई सुमन आणि वडील रामदास सावंत यांचे सहकार्य मिळत असते.
"प्रत्येकाने एक छंद जोपासला पाहिजे. माझ्या या कलेने मला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे. छंदातून करिअरची दिशा सापडते. मी तयार केलेल्या पेन्सील लीड वरील अष्टविनायकच्या प्रतिकृतींचा मला अभिमान आहे." - जीवन जाधव, कलावंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.