Asian Half Marathon: आशियाई अर्धमॅरेथॉनमध्ये महिला संघास कांस्‍य; नाशिकच्‍या पूनमची यशस्‍वी कामगिरी

कांस्यपदक विजेती पूनम सोनुने, कविता यादव, रीमा पटेल.
Asian Half Marathon women team won Bronze medal nashik news
Asian Half Marathon women team won Bronze medal nashik news

Asian Half Marathon : दुबई येथे झालेल्‍या पहिल्‍या आशियाई अर्धमॅरेथॉन २०२३ स्‍पर्धेत भारतीय धावपटूंनी आपली छाप सोडली आहे.

शनिवारी (ता. ११) झालेल्‍या या स्‍पर्धेत पुरुष गटात सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. महिला गटातून सांघिक प्रकारात कांस्‍यपदक पटकावले आहे. (Asian Half Marathon women team won Bronze medal nashik news)

या संघात नाशिकची धावपटू पूनम सोनुने हिचा सहभाग होता. स्‍पर्धेत भारतीय संघाकडून सहभागी होताना नाशिकच्‍या पूनम सोनुने हिने एक तास १९ मिनिटे २८ सेकंद वेळ नोंदविताना भरीव कामगिरी केली. संघातील कविता यादव हिने एक तास १९ मिनिटे ३३ सेकंद आणि रिमा पटेल हिने एक तास १९ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ नोंदविली.

Asian Half Marathon women team won Bronze medal nashik news
Marathon :रनिंग करताय मग फोलो करा या अकरा टिप्स

स्‍पर्धेत भारताला एकूण तीन पदके मिळाली असून, यात एक सुवर्ण व दोन कांस्‍यपदकांचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्‍या भारताच्‍या संघात सावन बरवाल, कार्तिक कुमार व अभिषेक पाल यांनी सुवर्णपदक पटकावले. वैयक्‍तिक गटातून सावन याने एक तास चार मिनिटे ३० सेकंद वेळ नोंदविताना कांस्‍यपदक जिंकले.

Asian Half Marathon women team won Bronze medal nashik news
Para Asian Games : पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १११ पदकांची कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com