Pooja Tambe : नाशिकची पूजा तांबे आशियाई स्पर्धेत चमकली; भारताला रौप्यपदक
India Bags Silver at Asian Roller Derby Championship : जिचॉन (द. कोरिया) येथे पार पडलेल्या आशियाई रोलर डर्बी स्पर्धेत भारताच्या संघाने रौप्यपदक पटकावले असून नाशिकची पूजा तांबे आणि महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले.
नाशिक: दक्षिण कोरियातील जिचॉन येथे पार पडलेल्या विसाव्या आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेत भारताच्या रोलर डर्बी संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले. या भारतीय संघात नाशिकच्या पूजा तांबे हिचा सहभाग होता.