Asian Track Cycling Competition : एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत शिया लालवानीचे यश

Asian Track Cycling Competition Shia Lalwani came 4th nashik new
Asian Track Cycling Competition Shia Lalwani came 4th nashik newesakal

Asian Track Cycling Competition : मलेशिया येथे पार पडलेल्या एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेमध्ये गोविंदनगर येथील रहिवासी शिया शंकर ललवाणी हिने भारताचे प्रतिनिधित्व करत चौथा नंबर पटकावला आहे. (Asian Track Cycling Competition Shia Lalwani came 4th nashik new)

ही स्पर्धा १४ जूनला पार पडली. नाशिक जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभाग घेणारी शिया ही पहिलीच खेळाडू आहे. शियाने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. अवघ्या १२० मायक्रो सेकंदाच्या फरकाने कास्यपदक दुरावल्याचे दुःख शियाच्या मनात आहे.

ही अतिशय अवघड स्पर्धा समजली जाते. ही सामान्य सायकलींपेक्षा वेगळी स्पर्धा समजली जाते. ट्रॅक सायकलिंग हा वेगळा प्रकार सध्या क्रीडा क्षेत्रात रूढ होत असून, नाशिककरांचे व भारताचे नाव तिने उंचावल्याचा अभिमान तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Asian Track Cycling Competition Shia Lalwani came 4th nashik new
Topless Sports league: 'या' अनोख्या स्पोर्ट्स लीगची चर्चा! नक्की काय आहे स्पर्धा, जाणून घ्या

शिया सध्या ती बीवायके कॉलेज येथे बीबीए पहिल्या वर्षाचा शिकत आहे. शिया लहानपणापासूनच जिम्नॅस्टिक, स्वीमिंग, मल्लखांब हे खेळ खेळत आली आहे. ट्रायथलॉन या स्पर्धेत देखील शियाने कामगिरी केली आहे. (स्व.) जसपाल सिंग बिर्दी हे तिचे आयडॉल आहेत.

Asian Track Cycling Competition Shia Lalwani came 4th nashik new
Sports Quota Govt. Job: खेळाडूंना 2 वर्षांची सवलत! राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com