Astrology Shubh Muhurat : विवाह, वास्तुशांती कार्याला दीड महिन्याचा ब्रेक! गुरू- शुक्राचा अस्त; थेट जूनमध्ये मुहूर्त

Nashik news : एप्रिलनंतर नागरिकांना थेट जून महिन्यात लग्न आणि वास्तू शांतीचे मुहूर्त असल्याची माहिती ज्योतिषांनी दिली आहे.
Shubh Muhurat
Shubh Muhuratesakal

नाशिक : यंदा गुरू- शुक्र या ग्रहांचा अस्त असल्याने विवाह अन् वास्तुशांती मुहूर्तांना तब्बल दीड महिन्यांचा ब्रेक लागला आहे. लग्नसराईची धामधूम खरी धामधूम होते ती मे महिन्यात. मात्र यंदा मे महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याने एप्रिलमध्येच घाईघाईने विवाह अन् वास्तुशांती कार्यक्रम आटोपून घ्यावे लागणार आहेत. एप्रिलनंतर नागरिकांना थेट जून महिन्यात लग्न आणि वास्तू शांतीचे मुहूर्त असल्याची माहिती ज्योतिषांनी दिली आहे. (Astrology One half month break for marriage vastu shanti work news)

शाळा, महाविद्यालयांना असलेली सुटी तसेच नोकरवर्ग आणि शेतकऱ्यांतूनदेखील विवाह अन् वास्तुशांती कार्यांसाठी मे महिन्याला अधिक पसंती दिली जाते. जूनमध्ये ग्रामीण भागात शेतकरी कामाकडे वळत असल्यामुळे विवाहाच्या तारखा शक्यतो धरत नाहीत. यंदा मात्र ऐन मे महिन्यात गुरू आणि शुक्र ग्रहाचा अस्त असल्याने नागरिकांसाठी मुहूर्तांची दुर्भिक्ष आहे.

पंचांगानुसार ६ मे ते २५ जून शुक्र अस्त तर ८ मे ते १ जूनपर्यंत गुरू अस्त आहे. अस्त काळात कोणतेही यज्ञ यागादी धार्मिक कर्म केले जात नाही ही धार्मिक मान्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे ज्यांना जूनपर्यंत थांबणे शक्य नाही. त्यांनी एप्रिलमध्येच लगबगीने विवाह कार्य उरकून घ्यावे लागतील.

तसेच एप्रिल महिन्यातील आता ५ आणि ६ तारखेनंतर थेट २९ जूनला वास्तूशांतीचा मुहूर्त आहे. त्यामुळे ज्यांना शास्त्रोक्त वास्तुशांती करायची आहे, त्यांना एप्रिलमधील हे दोन मुहूर्त साधावे लागतील अशी माहिती ज्योतिष अभ्यासक पंडित स्वप्नील जोशी यांनी दिली.

पंचांगात आपत्कालीन मुहूर्त

कामानिमित्त अनेक तरुण- तरुणी बाहेरगावी राहतात, कोणी परदेशी वास्तव्यास असते. ते काही काळासाठी घरी येतात. अशा उपवर वधुवरांना तसेच काही कौटुंबिक कारणास्तव विवाह अस्त काळात करावा लागत असल्यास अशा विवाहासाठी पंचांगात आपत्कालीन मुहूर्त देण्यात आले आहेत.

या मुहूर्तावर विवाह केले जाऊ शकतात. वास्तुशांती पुजनात ग्रह पूजन केले जाते. त्यामुळे ग्रहांच्या अस्तकाळात वास्तू शांतीपूजन हे शास्त्र मान्य नाही. कुठलेही यज्ञ-यागादी कर्म ज्यात ग्रह पूजन केले जाते ते अस्त काळात वर्ज्य करावे, असे पंडित जोशी यांनी सांगितले.  (latest marathi news)

Shubh Muhurat
Car Colour Astrology : कोणत्या रंगाची कार घेतल्याने होईल फायदा? तुमच्या राशीत दडलंय उत्तर

विवाह मुहूर्त

एप्रिल २०२४ - १८, २०, २१, २२, २६, २८

मे २०२४ - १, २

वास्तू शांती मुहूर्त

एप्रिल २०२४ - ५, ६

आपत्कालीन विवाह मुहूर्त

जून २०२४ -१२, १६, १८, २४

"एप्रिलमधील विवाह अन् वास्तुशांती मुहूर्तांनंतर आपत्कालीन मुहूर्त वगळता थेट जूनमध्ये मुहूर्त आहेत. अत्यंत आवश्यकता असेल तरच आपत्कालीन मुहूर्तावर आपले कार्य साध्य करावे."

- वे.शा.सं. पंडित स्वप्नील जोशी, ज्योतिष अभ्यासक.

Shubh Muhurat
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com