Nashik Crime: तडीपार भैय्याकडून तिघांना जिवे मारण्याचा प्रयत्न; शहा येथील राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक

Crime
Crimeesakal

सिन्नर : गुन्हेगारी कृत्यांमुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार असलेला शहा तालुका सिन्नर येथील भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर याने दुचाकीवरून जाणाऱ्या पंचाळे येथील तिघांच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) रात्री घडली.

याप्रकरणी भैय्या व त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी भैया यास त्याच्या शहा येथील राहत्या घरातून पोलिसांनी पंचासमक्ष अटक केली. (Attempt to kill three by Tadipar Bhaiya police made arrest from residential house in Shah Nashik Crime)

पंचाळे कोळपेवाडी रस्त्यावर शिंदेवाडी फाट्याजवळ दुचाकी वरून जाणारया तिघांवर भैय्या याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पंचाळे येथील कृष्णा दत्तू थोरात (23) हा भूषण खाडे व विशाल आहेर यांच्यासोबत शुक्रवारी रात्री अकरा वाजता शिंदेवाडी फाट्यावरील हॉटेल कुबेर येथे जेवण करून पांचाळेकडे जात होते.

दुचाकी क्रमांक एम. एच. 15/ जे. जे. 5028 व एम. एच. 15/ इ. सी. 3705 वरुन ते जात असताना भैय्या याने कृष्णाला फोन करुन शिवीगाळ केली.

तुमच्यामुळेच माझ्यावर पोलीस केस झाली आहे असे सांगून तुम्हाला प्रत्येकाला कल्पेश आंधळे याच्यासारखे गाडीखाली घालून मारून टाकतो असा दम दिला.

फोन बंद केल्यानंतर काही मिनिटातच भैया व त्याच्या ओमकार नामक एक अल्पयीन मुलगा असे दोघे हायवा क्रमांक एम. एच. 06/ ए. सी. 6124 घेऊन पाठीमागून आले. काही कळण्याच्या आतच हायवा ट्रक त्याने दोन्ही दुचाकीवर घातला. यामुळे कृष्णा व त्याचे मित्र दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

भैयाने पुढे काही अंतरावर हायवा थांबवत लोखंडी रॉड काढून कृष्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात कृष्णाच्या डोक्याला रॉड लागल्याने तो जखमी झाला. यावेळी संशयित आरोपी भैयाने कृष्णाला शिवीगाळ करत 'आता तू वाचला मात्र, पुढच्या वेळी मारून टाकतो' असा दम देत तेथून पोबारा केला.

Crime
Nashik Crime: ‘फोम’ ऐवजी थर्माकोलच्या गाद्याची विक्री! पंचवटीत मनसेकडून परप्रांतीय विक्रेत्याचा पर्दाफाश

यानंतर कृष्णाला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. कृष्णाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या कांदळकर व त्याच्या सोबतचा अल्पवयीन मुलगा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन जिल्ह्यातून तडीपार असला तरी भैय्या कांदळकर हा नेहमीच शहा येथेच वास्तव्याला असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. 31 जुलै रोजी एका गुन्ह्यात नाव आल्यानंतर वावी पोलिसांनी भैय्या यास सिनेमा स्टाईल कारवाई करत अटक केली होती.

त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी कारवाईत अडथळे निर्माण केले होते. त्या तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

मात्र, तेथून जामिनावर सुटल्यावर भय्या याने शुक्रवारी पुन्हा पंचाळे येथील तरुणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम आपल्या सहकाऱ्यांसमवेत शहा येथे भैय्याच्या घरी गेले असता नेहमीप्रमाणे त्याच्या आई वडिलांनी तो घरी नसल्याचे सांगितले. मात्र तांत्रिक माहितीनुसार भैय्या घरातच असल्याची खात्री पोलिसांना असल्याने

वावी पोलीस ठाणे येथून बंदोबस्त मागवण्यात आला. गावातील पंचांसमक्ष श्री. निकम यांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर बाथरूम मध्ये लपलेल्या भैय्याला ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाईचे पोलिसांकडून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.

तसेच त्याच्या आई-वडिलांची देखील कॅमेरासमोर साक्ष घेण्यात आली. भैय्या याच्यासोबत असलेला अन्य संशयित अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांकडून त्याच्याबद्दल माहिती सांगण्यास नकार देण्यात आला.

Crime
Crime News : नराधम बापाला फाशीची शिक्षा; स्वतःच्याच मुलीवर केला बलात्कार अन्..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com