'गणेशोत्सवात गर्दी टाळा, शासनाचे निर्देश पाळा!'...महापौरांचे गणेश मंडळाना आवाहन

satish kulkarni.jpg
satish kulkarni.jpg

नाशिक : स्वातंत्र्य पुर्व काळापासून सुरु झालेला सार्वजनिक गणेशोत्सव  जागतिक स्तरावर पोहोचला आहे. दरवर्षी प्रत्येकजण मोठ्या दिमाखात उत्सव साजरा करतो. परंतु यंदा कोरोना महामारीने मोठे संकट निर्माण केल्याने त्याचा मुकाबला करण्यासाठी गर्दी टाळण्याबरोबरच शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळण्याचे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले. 

महापौर कुलकर्णी यांच्या सूचना 

सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्रमुखांशी महापौर कुलकर्णी यांनी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेश मंडळांनी पुर्वपरवानगी घ्यावी, मंडप धोरणाची अंमलबजावणी करावी, सार्वजनिक श्री गणपतींची सजावट साध्या पध्दतीची असावी, सार्वजनिक मंडळांसाठी ४ तर घरगुती गणपती मुर्तीच्या उंचीची मर्यादा दोन फुटापर्यंत असावी, शाडूच्या मातीच्या मुर्तीचे घरच्या घरी विसर्जन करावे, शक्य नसल्यास कृत्रिम तलावात विसर्जन करावे. आगमन व विसर्जन काळात गर्दी टाळावी, उत्सवाकरीता स्वेच्छेने वर्गणी किंवा देणगी दिल्यास स्वीकार करावा. आकर्षक जाहीराती नको, आरोग्य व सामाजिक संदेशाच्या जाहिरती असाव्या, उत्सव काळात आरेाग्य विषयक उपक्रम राबवावे, आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणसंदर्भातील नियमांचे पालन करावे.

मिरवणुक, सार्वजनिक आरतींना यंदा फाटा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने प्रतिस्थापना व विसर्जन मिरवणकींवर यंदा बंदी आणली आहे. त्याचबरोबर श्री गणेश आरतीसाठी मान्यवरांना निमंत्रित करण्याची परंपरा नाशिकमध्ये आहे. परंतू गर्दी टाळण्यासाठी यंदा सार्वजनिक आरतीसाठी निमंत्रित करता येणार नाही व मंडळांनी देखील नियम पाळण्याचे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले. मंडप व परिसर निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करावी, मंडळांनी मंडपात मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले. 

गणेश मंडळांनी शासन निर्देशाचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना महामारीचे संकट विघ्नहर गणेश निश्चितच आपल्या बरोबर घेउन जाइल अशी माझी एक गणेशभक्त म्हणुन रास्त्‍ भावना आहे. महापौर या नात्याने कळकळीने विनंती करतो की गणेश उत्सवात गर्दी टाळा, त्यामुळे निश्चितच कोरोनाला आळा बसेल. - सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com