Snake Bite : कोब्राचा दंश झालेल्या चिमुकल्याला जीवदान! 4 दिवस होता वेटींलेटरवर

baby saved from cobra snake bite nashik news
baby saved from cobra snake bite nashik newsesakal

Snake Bite : घरामध्ये रात्रीच्या वेळी अभ्यास करीत असताना जमिनीवर पडलेली पेन्सील उचलण्याठी गेलेल्या आठ वर्षिय चिमुकल्याच्या बोटाला अत्यंत विषारी अशा कोब्राने दंश केला. यामुळे प्रकृती अत्यंत खालावलेल्या चिमुकल्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चार दिवस व्हेटिंलेटरवर ठेऊन ॲण्टी स्नेक बाईटचे ४१ डोस देण्यात आल्याने चिमुकल्यास जीवदान मिळाले आहे. सिद्धांत दीपक निकम (वय ८, रा. वजीरखेडे, ता. मालेगाव) असे या चिमुकल्याचे नाव आहे. (baby saved from cobra snake bite nashik news)

गेल्या २० जूनला सिद्धांत शेतातील घरात रात्री अभ्यास करीत बसला होता. त्यावेळी त्याचे वडील दीपक निकम घरात नसल्याने आईने शेजारी राहणारे ज्ञानेश्‍वर शेवाळे यांना बोलावून घेतले. सिद्धांत काही मिनिटांतच बेशुद्ध पडल्याने त्याला तत्काळ मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचारांनंतर तत्काळ ॲण्टी स्नेक बाईटचे इंजेक्शन्स देण्यात आले. परंतु, सिद्धांतची प्रकृती क्षणाक्षणाला खालावत असल्याने पालकांचीही भिती वाढली. तेथून काही वेळात त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने सिद्धांतला नाशिकला हलविण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार, तत्काळ रुग्णवाहिकेतून सिद्धांतला गंगापूर रोडवरील साफल्य हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेत, प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेत आवश्‍यक त्या वैद्यकीय उपाययोजना करण्यात आल्या. मध्यरात्री सव्वाबारा ते साडेबाराच्या सुमारास त्यास साफल्य रूग्णालयात आणण्यात आले. सिद्धांतवर उपचारासाठी डॉ. अभिजित सांगळे यांची टीम सज्ज होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिद्धांतला व्हेंटीलेटर लावून वैद्यकीय चाचण्या घेत उपचार सुरू करण्यात आले. तिसऱ्या दिवसापर्यंत सिद्धांतला पूर्णपणे शुद्ध नव्हती. चौथ्या दिवशी व्हेटींलेटर काढण्यात आले. तरीही त्याला अशक्तपणा आणि आवाजात कमतरता होती.

बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सांगळे यांनी त्याच्यावर उपचार केले. आठव्या दिवशी त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जाताना पालकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह स्टाफचे आभार मानले.

पालक हवालदील

निकम कुटूंबामध्ये यापूर्वीही एका मुलाचा सर्पदंशाने मृत्यु झाला आहे. त्यामुळे सिद्धांतलाही सर्पदंश, त्यातही कोब्राने दंश केल्याने निकम कुटूंबिय हवालदील झाले होते. त्यांना काहीही करून सिद्धांतला वाचवायचे होते.

baby saved from cobra snake bite nashik news
Nashik Road Damage: गेल्या वेळी ठेच अन तरीही यंदा तेच! शहरातील रस्त्यांची वाट झाली बिकट

सर्पदंश झाल्यापासून अवघ्या तीन तासात सिद्धांत नाशिकच्या साफल्य रुग्णालयात दाखल झाला होता. या दरम्यान निकम कुटूंबियांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. परंतु, सातव्या दिवशी सिद्धांत पुन्हा बोलू लागल्यानंतर त्यांचा जीवात जीव आला.

"सिद्धांतला विषारी कोब्राने दंश केलेला होता. वेळीच उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, चौथ्या दिवसांपर्यंत त्याची प्रकृती नाजूक होती. आमच्या परीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. ४१ ॲण्टी स्नेकबाईटचे इंजेक्शन्स द्यावे लागले. आज तो हसत जाताना पाहून खूप समाधान वाटले." -डॉ. अभिजित सांगळे, बाल रोगतज्ज्ञ, साफल्य हॉस्पिटल, नाशिक.

baby saved from cobra snake bite nashik news
Nashik Industrial Investment: औद्योगिक गुंतवणूकीत नाशिक पुन्हा कोरडेच! मुंबई, पुणे आणि संभाजीनगरलाच महत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com