esakal | राज्यातील महाविकास आघाडी भक्कमच, वादाच्या चर्चा खोट्या; बच्चू कडूंचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

राजकीय नेत्यांमधले वाद खरे असतात का? - बच्चू कडू

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : केवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संघर्ष आहे. वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात का? राज्यातील महाविकास आघाडीत तसंच आहे, कुठलेही मतभेद नाहीत. असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. (Bacchu-kadu-said-about-Aahavikas-Aghadi-Government-nashik-political-news)

महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे

राज्यमंत्री बच्चू कडू आज सकाळी नाशिकला न्यायालयात तारखेसाठी हजर होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अपंगाच्या योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईसह भरतीबाबत मुद्यावरुन महापालिकेतील बैठकीत, बच्चू कडू यांच्या विरोधात बैठकीतील गोंधळाबद्दल गुन्हा दाखल झाला होता. त्यात ते हजर नसल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले होते. ते म्हणाले की, राज्यातील सरकार कोसळेल असे वारंवार चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात हा सगळा दिखावा असून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.

हेही वाचा: भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

पुढील तारखेला बैठक

दरम्यान आज त्यांनी न्यायालयात हजर राहिले. पुढील तारखेला जिल्ह्यातील अंपगाच्या प्रश्नाबाबत बैठक घेउन त्याचवेळी खटल्याला हजर राहणार आहे. हा विषय जिल्हा न्यायालयात वर्ग होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास सरकार मधील घटक पक्षात कुरुबूरी सुरु आहे. कॉग्रेस पक्षाकडून स्वबळाची भाषा केली जाते. आघाडीतील घटक पक्षात कायमच कुरुबुर सुरु असते. गाठीभेटी बैठकातून कायमच अस्वस्थतेचे वातावरण आहे. याविषयी ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांमधील संर्घष किंवा कुरुबुरीचे चित्र हा केवळ दिखावा आहे. हा संर्घष वरवर दाखविण्यापुरता आहे? असा उलटा प्रश्न उपस्थित केला.

(Bacchu-kadu-said-about-Aahavikas-Aghadi-Government-nashik-political-news)

हेही वाचा: चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग!

loading image