सटाणा: ईव्हीएमद्वारे निवडणूक ‘मॅनेज’ करून निकाल आपल्या बाजूने वळविता येतो का, या विषयावरून देशभरात राजकीय वादंग सुरू असताना, बागलाण विधानसभा निवडणुकीदरम्यान गुजरातमधील एकाने तब्बल पाच ते आठ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ५० हजार ते दीड लाख मते ‘सेट’ करून उमेदवार दीपिका चव्हाण यांचा विजय सुनिश्चित करण्याचा प्रस्ताव मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, यामुळे बागलाणच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.