Bail Pola 2023: बैलांवर रेखाटले आरक्षण, दुष्काळ,सरकारचे दुर्लक्ष; येवल्यात शिंदे परिवाराची मानाची मिरवणूक

Shinde Parivar worshiping the bull of Mana in the city. The procession in the second photograph.
Shinde Parivar worshiping the bull of Mana in the city. The procession in the second photograph.esakal

Bail Pola 2023 : दुष्काळाच्या सावटाखाली पोळा सणानिमित्त बळीराजाने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटले. शहर व तालुक्यात पोळा जल्लोषात झाला. (Bail Pola 2023 Reservation drawn on bulls drought government neglect Honorable procession of Shinde family nashik)

esakal

शेतकऱ्यांनी बैलांवर रंगाने रंगोटी करून आरक्षण द्या, दुष्काळ जाहीर करा, सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, शेतमालाला भाव द्या यांसह विविध लक्षवेधी संदेश रेखाटले होते.

शहरातील बैलपोळ्याचा मान शिंदे कुटुंबीयांना असून, ढोल-ताशांच्या गजरात प्रगतिशील शेतकरी भास्कर शिंदे यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन गंगादरवाजा भागात महादेव मंदिरासमोर करण्यात आले.

ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, सुनील शिंदे, भास्कर शिंदे, अरविंद शिंदे, आबासाहेब शिंदे, अशोक शिंदे, अनिल शिंदे, सुभाष शिंदे, दिलीप खोकले यांच्यासह शेतकरी नागरिक उपस्थित होते.

मोरे वस्ती, सोनवणे वस्ती व शहरातील आजूबाजूच्या शेतकरी कुटुंबीयांनी वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढत पूजा केली. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांना कवडीमोल भाव मिळत असला, तरी शेतात राबराब राबणाऱ्या सर्जा-राजाचा पोळा तालुक्‍यात शेतकऱ्यांनी साजरा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shinde Parivar worshiping the bull of Mana in the city. The procession in the second photograph.
Bail Pola Festival 2023: मोरकुरे येथील शेतकऱ्याने लाडक्या बैलजोडीचा केक कापून साजरा केला पोळा!

मात्र, दुष्काळाचे प्रतिबिंब पोळा सणातून दिसले. तसेच विविध प्रश्न व अनोखे संदेश रेखाटून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न बळीराजाने केला.

शेतकरी महिलेने नैवेद्य दाखवत, औक्षण करत आपल्या सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातही गावोगावी हनुमान मंदिरांसमोर बैलाची पूजा करून मानाची जपणूक करत पोळा साजरा झाला.

तालुक्यात बहुतांश भागांत दुष्काळ व लंपीचे सावट असल्यामुळे पोळा साजरा करताना शेतकऱ्यांत काहीसा निरुत्साही जाणवला. पावसाळ्यात येणाऱ्या पोळा सणाला नदी-नाले पाण्याने वाहत असतात.

मात्र, या वर्षी पाऊस नसल्याने सर्वच जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना लाडक्‍या सर्जा-राजाला अंघोळ घालण्यासाठी पाण्याचा शोध घ्यावा लागला. कुठे हौदावर तांब्याने, तर कुठे पाइपने बैलांना अंघोळ घालण्यात आली.

यानंतर गावागावांत बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली. घरी बैलांचे औक्षण करण्यात आले. त्यांना पुरणपोळीचा घास भरविण्यात आला. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बैलापोळ्याच्या उत्साह म्हणावा तेवढा दिसून आला नाही.

Shinde Parivar worshiping the bull of Mana in the city. The procession in the second photograph.
Bail Pola Festival 2023 : बागलाण तालुक्यात अनोखा बैलपोळा; बैलाएैवजी ट्रॅक्टरने घातल्या प्रदक्षिणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com