Nashik News : नैताळेच्या ‘पक्ष्या’ने ‘बकासूर’वर मिळविला विजय; शौकिनांकडून आनंदोत्सव

बैलगाडा शर्यतीत मानाचे किताब मिळविलेल्या व थार गाडी आणि इतर बक्षिसे मिळविणाऱ्या मुळशी (जि. पुणे) येथील बकासूर बैलाला नैताळ्याच्या ‘पक्ष्या’ बैलाने कल्याणच्या शेलू मैदानात झालेल्या बिनजोड शर्यतीत हरवून विजय मिळविला.
Naitalekar celebrating after the victory of the bull 'Paksya' in the bullock cart competition at Shelu Maidan.
Naitalekar celebrating after the victory of the bull 'Paksya' in the bullock cart competition at Shelu Maidan.esakal

Nashik News : संपूर्ण राज्यात बैलगाडा शर्यतीत क्रमांक एकवर असलेल्या, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, असे बैलगाडा शर्यतीत मानाचे किताब मिळविलेल्या व थार गाडी आणि इतर बक्षिसे मिळविणाऱ्या मुळशी (जि. पुणे) येथील बकासूर बैलाला नैताळ्याच्या ‘पक्ष्या’ बैलाने कल्याणच्या शेलू मैदानात झालेल्या बिनजोड शर्यतीत हरवून विजय मिळविला.

या विजयाबद्दल नैताळेच्या टांगा व बैलगाडा शौकिनांनी फटाक्यांची आतिषबाजी करून, गुलाल उधळून जल्लोष केला. (Bakasur bull was defeated by Netala Paksha bull to win in an uneventful race at Shelu Maidan Kalyan nashik news)

नैताळेचे बैलगाडा मालक रतन यशवंत बोरगुडे यांच्या ‘पक्ष्या’, तर गजानन म्हात्रे यांच्या ‘शंकर’ बैलाने कल्याण येथील शेलू मैदानात बिनजोड शर्यतीत हा इतिहास घडवला. बैलगाडा शर्यतीच्या दिवशी पीकअप गाडी व दहा जणांना बरोबर घ्यावे लागते. ‘पक्ष्या’ तीन वर्षांत ४४३ बैलगाडा शर्यती खेळला. त्यापैकी ४११ वेळा विजयी झाला, तर ३२ वेळा पराभव झाला. फुलगावच्या घाटात घाटाचा राजा व बुलेट या दुचाकीच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. जाधव वाडीच्या घाटात शाईन गाडीचा मानकरी ठरला.

या विजयाबद्दल लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बोरगुडे, विकास सोसायटीचे चेअरमन देविदास बोरगुडे, संचालक शिवाजी बोरगुडे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तू भवर, किशोर बोरगुडे, सोपान बोरगुडे, वैभव गाजरे, दिलीप घायाळ, सुनील बोरगुडे, योगेश बोरगुडे.

Naitalekar celebrating after the victory of the bull 'Paksya' in the bullock cart competition at Shelu Maidan.
Nashik News: ट्रॅक्टरच्या धडकेने रेल्वे फाटक बंद! निफाड स्थानकाजवळ दीड तास वाहतुकीचा खोळंबा

आण्णा पाटील बोरगुडे आदींनी अभिनंदन केले आहे. या शर्यतीसाठी टिलू शिंदे, ज्ञानेश्वर बनसोडे, ऋषिकेश खुळे, सागर खुळे, धनंजय खुळे, सुदाम घुले, सूर्यभान भवर, वाल्मीक बोरगुडे, पप्पू जाधव, विशाल घायाळ, कृष्णा बोरगुडे, गौतम बोरगुडे, बापू घायाळ, किरण घायाळ, सर्जेराव बोरगुडे, महेश बनकर, प्रकाश काकडे, पुंडलिक दराडे आदींनी परिश्रम घेतले.

''‘पक्ष्या’ बैलाचे आम्ही सहा वर्षांपासून सांभाळ करीत आहोत. त्याला रोज सकाळी चंदीमध्ये अर्धा किलो खारीक देतो. दोन किलो डाळी महिन्यातून, दोन ते तीन वेळा अंडी व दूध पाजतो. बदलत्या ऋतूनुसार त्याला गार व गरम पाण्याने अंघोळ घालतो.''-अनिल बोरगुडे, सुनील बोरगुडे, शेतकरी

Naitalekar celebrating after the victory of the bull 'Paksya' in the bullock cart competition at Shelu Maidan.
Nashik News : वाइन उद्योगाकडून निर्णयाचे स्‍वागत; उद्योजकांना शासन निर्णयाची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com