बाळा कोकणे हल्ला प्रकरण : पाचवा संशयित जेरबंद

used in Crime bike seized by police.
used in Crime bike seized by police.esakal
Updated on

जुने नाशिक : शिवसेना पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा कोकणे यांच्यावर हल्लाप्रकरणी पाचव्या संशयितास अंबड येथून अटक झाली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी आणि हत्यार जप्त करण्यात आले. (Bala Konkane attack case Fifth suspect jailed Nashik crime Latest Marathi News)

गुरुवारी (ता. २८) भद्रकाली पोलिसांनी मनोज पाटील, पंकज सोनवणे, सूरज राजपूत, सागर दिघोळे अशा चौघा संशयितांना गडकरी चौक येथून अटक केली. अन्य दोघे संशयित फरारी होते.

फरारी संशयितांपैकी आकाश फडके यास गुन्हे शोध पथकाकडून शुक्रवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास अंबड येथून ताब्यात घेतले. अटक संशयितांची संख्या पाच झाली असून, अद्याप एक संशयित फरारी आहे.

दरम्यान, संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या (एमएच १५, ईएन ०२०५), (एमएच १५, जीबी ४३९३), (एमएच १५, एफबी ३८६४) अशा तीन दुचाकी, लाकडी दांडके पोलिसांनी हस्तगत केले.

उपनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून लावलेल्या फलकावर शाही फेक आंदोलन केल्याप्रकरणी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, मनोज पाटील, पंकज सोनवणे, सूरज राजपूत, सागर दिघोळे संशयितांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कुठली सुनावण्यात आली आहे. चौघा संशयितांवर खून, खंडणी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

used in Crime bike seized by police.
राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे : छगन भुजबळ

शासकीय विश्रामगृहाचा आधार

बाळा कोकणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर संशयितांनी चक्क शासकीय विश्रामगृहाचा आधार घेतला. काही वेळ थांबून गुन्ह्यात वापरलेल्या तीनही दुचाकी विश्रामगृहाच्या आवारात पार्क केल्या.

शुक्रवारी पोलिसांनी विश्रामगृहातून तीनही दुचाकी हस्तगत केल्या. या घटनेतून शासकीय विश्रामगृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत आहे.

used in Crime bike seized by police.
SBI ATM फोडण्याचा प्रयत्न; संशयित तत्काळ जेरबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.