Nashik News: नाशिक रोडला दिशादर्शकावर बॅनरबाजी! मनपाचे दुर्लक्ष

A banner placed on a signpost on the main road at Nashik Road.
A banner placed on a signpost on the main road at Nashik Road.esakal

Nashik News : परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेला दिशादर्शक फलक नेत्याच्या पोस्टरबाजीमुळे पुन्हा झाकला गेला आहे.

नेत्यांच्या बॅनरबाजीमुळे नाशिक रोडच्या दिशादर्शक फलक सातत्याने झाकले जात असल्याने यावर नाशिककर यांच्यासह वाहनचालक व प्रवासी यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Banners on Nashik road direction board NMC neglect Nashik News)

नाशिक महापालिकेतर्फे शहर व नाशिक रोडच्या विविध भागात बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना सोपा जावा म्हणून ठळक अक्षरात विशिष्ट उंचीवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे.

यावर महत्त्वाच्या विविध ठिकाणाची नावे आणि त्या भागात जाण्यासाठीचा मार्ग देखील दर्शविण्यात आला आहे. शिर्डी, संगमनेर सिन्नर, पुणे, नगर आदी ठिकाणाहून नाशिक रोड भागात येणाऱ्या प्रवासी, चालक यांना नाशिक रोड भागात प्रवास करणे सोपे होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A banner placed on a signpost on the main road at Nashik Road.
Jalyukt Shivar Yojana: जलयुक्त शिवारचा आराखडा अडीच हजार कोटींचा!

परंतु गेल्या काही दिवसापासून राजकीय पुढारी व त्यांचे समर्थक यांच्याकडून नाशिक रोड भागातील दिशादर्शन फलकांवर नेत्यांचे पोस्टर लावत असल्याने हे दिशादर्शक पूर्णपणे झाकले जात असल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना कोणता रस्ता कुठे जातो हे समजत नसल्याने सातत्याने दिशादर्शक फलकावर होणाऱ्या अतिक्रमण तत्काळ थांबवीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

"नाशिक रोड येथे दिशादर्शक फलक बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी आहे. याचा कोणीही दुरुपयोग करत असेल तर ते त्वरित काढले जातील."

- मदन हरिश्चंद्र, मनपा विभागीय अधिकारी नाशिक रोड

A banner placed on a signpost on the main road at Nashik Road.
NMC News: कागदावर नसलेल्या उद्यानांवर ‘होऊ द्या खर्च’! मोकळ्या भुखंडावरील विकसित उद्यानाकडे आरोग्याचा कानाडोळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com