नाशिक : पाणी टंचाईला बारभाई कारभार जबाबदार

गिव्हा कुटे येथे भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी पायपीट
Water scarcity
Water scarcitysakal

मालेगाव : दुबळावेल १२ गाव पाणीपुरवठा योजना शोभेची वस्तू बनली असून गिव्हा कुटे येथे भीषण पाणी टंचाई आहे. येथील ग्रामस्थांना व तांड्यातील लोकांना १ किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. मालेगांव तालुक्यातील ग्रा पं गिव्हा कुटे येथे बारा ते पंधरा वर्षापुर्वी दुबळवेल १२ गाव पाणीपुरवठा योजना ही सोनाळा लघु पाटबंधारे प्रकल्पवरुन कोटी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे केवळ एक वर्षे पाणी पुरविण्यात आले. त्यामुळे ही योजना गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे. शासनाने प्रत्येक गावात जल जीवन मिशनअंर्तगत हर घर जल ही योजना कार्यान्वित केली. पण ही योजना गिव्हा कुटे येथे फक्त कागदपत्रावरच आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी एप्रिल महिन्याची चाहुल लागताच ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येणार की काय? असे वाटत आहे. गिव्हा कुटे गावाची अंदाजे लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे. गावांमध्ये जवळपास दोन तीन विहिरी आहेत. परंतु त्या सुद्धा पाण्याची पातळी खोल गेल्याने आटण्याच्या मार्गावर आहेत व दोन- हातपंप आहेत व ते सुद्धा नादुरुस्त आहेत. एक हातपंप जिल्हा परिषद शाळेत असल्यामुळे सदरचा हातपंप हा पाणीटंचाई दरम्यान गावातील जनतेसाठी खुला करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन पाणी टंचाई आहे. येथील पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यासाठी १२ गाव पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू केल्यास पाणी टंचाईची समस्या सुटेल पण ही जीवन प्राधिकरणाची योजना केवळ प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे गिव्हा कुटे येथील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मागील कित्येक वर्षांपासुन गावातील अंबादास कुटे पाटील यांच्या शेतातील विहिर अधिग्रहण करुन समस्या निकाली निघत असते पण गेल्या दोन ते तीन वर्षापासुन विहिर अधिग्रहणाचा कुठलाच मोबदला प्रशासनाकडुन त्यांना मिळालेला नाही.

गावातील विहिरीत पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. हातपंप बंद अवस्थेत आहेत. गावाबाहेर एकच विहिर आहे. तिला मोजकेच पाणी आहे. त्यावरील मोटरपंपावरुन गावाला ग्रा.पं.मार्फत पाणीपुरवठा केला जात असे पण गेल्या पाच ते सहा महिन्यांपासुन ग्रा पं ने वीज बिल भरले नसल्यामुळे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बंद आहे. त्यामुळे गावातील महिलांना १ कि मी वरुन पाणी आणावे लागत आहे.

तरी प्रशासनाने वेळीच कायमस्वरुपी नियोजन केले तर येथील पाणी टंचाई समस्या दूर होऊ शकते, नियोजनाच्या अभावामुळे येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तर एकीकडे चक्क गावामध्ये टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. येथील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लवकरात लवकर प्रशासनाने विहिर अधिग्रहण करुन किंवा टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

प्रस्ताव पाठविणार

गावात पाणीटंचाई आहे. विहिर अधिग्रहित करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे सरपंच राजू चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com