esakal | नाशिक : सराफ व्यावसायिकास बेदम मारहाण; संशयितांनी पळवली दागिन्याची बँग
sakal

बोलून बातमी शोधा

gold

नाशिक : सराफ व्यावसायिकास मारहाण; दागिन्याची बँग पळवली

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : श्रमिकनगर भागातील गंगासागर परिसरातील सराफ व्यावसायिक शनिवारी (ता.४) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घरी जात असतांनाच वाटेत अडवून धारदार शस्त्रांनी मारहाण करीत त्यास जखमी केले. तसेच हातातील सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन संशयित पसार झाले. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यावसायिकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोन्याच्या दागिन्याची बॅग घेऊन संशयित पसार

सातपूर श्रमिकनगर येथील गंगासागर या परिसरातील स्वामी हाईट या बिल्डींगमध्ये महेश दिलीप टाक यांचे श्री येमाई माता ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी नेहमी प्रमाणे रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकानातील दागिने घेऊन जवळच असलेल्या त्यांच्या घरी जात होते. शाळेतील नाल्या जवळ मागे पुढे कोणीही येत नसल्याचा फायदा घेत दोन मोटरसायकल वरील संशयितांनी महेश यांच्यासमोर दुचाकी आडवीकरून हातातील धारधार शस्त्रांनी मारहाण करत जखमी केले. महेश यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यात वार करत हातातील बॅग हिसकावत संशयित पसार झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संशयित हे महेश यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी महेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे या गुन्ह्यात नेमका किती रुपयाचा माल गेला, याची खातरजमा सातपूर पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा: यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

भाईगिरींची दहशत

या परिसरात पगाराच्या वेळी तसेच रात्री-अपरात्री सेकंड शिफ्ट सुटल्यानंतर पायी अथवा सायकलवर जाणाऱ्या कामगारांना अडवून खिशातील पैसे तसेच मोबाईल हिसकावून घेतल्याच्या घटना नित्याच्या झाल्या असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही गुन्हेगार भाईगिरी करीत आपली दहशत माजवण्याचा प्रकार ही करीत आहेत. भाईगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

loading image
go to top