esakal | यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

two brothers death

यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

sakal_logo
By
विजय पेंढरे

एरंडगाव (जि.नाशिक) : बैलपोळ्याच्या (bail pola festival) पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने एरंडगाव (ता. येवला) येथील जगताप कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. येथे दर वर्षी अतिशय आनंदाने बैलपोळा साजरा होतो. परंतु प्रत्येकाच्या काळजात धस्स करणारी घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. काय घडले नेमके?

यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने एरंडगाव (ता. येवला) येथील संतोष पुंडलिक जगताप यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संतोष जगताप पत्नीसोबत प्रथेनुसार सण घेऊन पाहुण्यांकडे गेले होते. घरी कुणीही नसताना त्यांची दोन्ही मुले हर्षद (वय १३) व सार्थक (१०) सायंकाळी पाचच्या दरम्यान तळ्याकडे गेले. लहाना सार्थक (शिवा) तळ्यात पोहण्यास उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मोठा भाऊ हर्षद त्याला वाचविण्यासाठी गेला. परंतु दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सार्थक व हर्षद दोघेही साताळी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. सार्थक पाचवीत, तर हर्षद सातवीत शिकत होता.

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

वंशाचा दिवा हरपला

आई-वडील घरी आल्यावर मुले घरात न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली असता तळ्याच्या काठावर दोघांचे कपडे सापडले, तेव्हा काहीतरी अघटित घडले असावे, असा संशय येत त्यांनी तळ्यामध्ये शोध सुरू केला असता दोन्हीं मुले पाण्यात सापडली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेने संतोष जगताप यांच्या वंशाचा दिवा हरपला आहे. येथे दर वर्षी अतिशय आनंदाने बैलपोळा साजरा होतो. परंतु प्रत्येकाच्या काळजात धस्स करणारी घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: CET : अधिकृत तारखांची प्रतीक्षा! विद्यार्थी-पालकांत संभ्रम

loading image
go to top