Paintings and decorations on the walls of bus stands.
Paintings and decorations on the walls of bus stands.esakal

Nashik: बोलक्या भिंतीने खुलले येवला बसस्थानकाचे सौंदर्य! स्वच्छ, सुंदर अभियानाच्या 2 सर्वेक्षणात येवला आगार जिल्ह्यात प्रथम

राज्य परिवहन महामंडळाने हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान हाती घेतले आहे.

येवला : राज्य परिवहन महामंडळाने हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान हाती घेतले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन सर्वेक्षणात येवला आगार ‘अ’ बसस्थानक प्रवर्गात नाशिक जिल्ह्यात प्रथम आहे.

पुढील टप्प्यासाठी बसस्थानकात स्वच्छता, सौंदर्य खुलविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसस्थानकाच्या भिंती बोलू लागल्या आहेत.

‘विठुरायाच्या दर्शनाला चाललेले भाविक’, भिंतीवरचे विविध आदिवासी व वारली चित्रे, प्रवेशद्वारावर ठेवलेल्या कुंड्यांमुळे बसस्थानकाने कात टाकली आहे. (beauty of msrtc bus stand wall Yeola Agar 1st in district in 2nd survey of Clean Sundar Abhiyaan Nashik news)

बसस्थानकांच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे व केलेले सुशोभीकरण
बसस्थानकांच्या भिंतीवर रेखाटलेली चित्रे व केलेले सुशोभीकरणesakal

परिवहन राज्य महामंडळाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून, उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रादेशिक स्तरावर ‘अ’ वर्ग बसस्थानक प्रथम बक्षीस १० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५ लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, ‘ब’ वर्ग प्रथम बक्षीस ५ लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय १.५० लाख व प्रशस्तीपत्र, ‘क’ वर्ग बसस्थानक प्रथम १ लाख चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५० हजार व प्रशस्तीपत्र, तृतीय २५ हजार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी नव्या बांधकामांमुळे येथील बसस्थानकाला झळाली मिळाली असून, नवीन दोन फलाट बांधले आहेत. जुन्या फलाटांचे नूतनीकरण झाले असून, संपूर्ण परिसरात काँक्रिटीकरण झाले आहे.

फलाटावरांवर बस उभ्या राहणाऱ्या गावांचीव नावे नवीन टाकली आहेत. दर्शनी भिंतीवर डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करणारी विठाई बसचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. हस्तकलेतून जणू पंढरीचा विठ्ठल वारकऱ्यांसह निसर्गाची हरितवारीच करतोय, असे वाटते.

रयतेला पर्यावरणाचे महत्त्व सांगत असल्याचा भास भिंतीकडे पाहणाऱ्या प्रवाशांना होतो. इतर दर्शनी भिंतीवर आदिवासी बंधू-भगिनींचा डोंगर दऱ्या, निसर्गातील जीवन प्रवास, त्यांचा लग्न सोहळा, शेतकरी, पशु-पक्षी, झाडे व त्यांचा यात्रोत्सव, अशी आकर्षक चित्रे रेखाटली आहेत.

Paintings and decorations on the walls of bus stands.
Narendra Modi Nashik Visit: PM मोदींच्या स्वागतासाठी दादांचे तीन पावले नृत्य, व्हिडिओ व्हायरल...

बसस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवला असून, चाफा, पाम ट्री, सायप्रस शोभीवंत झाड्यांच्या कुंड्या ठेवून परिसर स्वच्छ, सुंदर व मनमोहक केला आहे. सुशोभीकरणासाठी नितीन कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

बसस्थानकाच्या भिंती पेंटर लक्ष्मण साळी यांच्या कुंचल्यातून बोलक्या झाल्या आहेत. सौंदर्यकरण व स्वच्छतेसाठी नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्या मार्गदर्शनाखाली येवला आगाराचे पालक अधिकारी विजय झगडे, आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे, सर्व अधिकारी, चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

"नाशिक ते संभाजीनगर व धुळे टेबनगर महामार्गावरील मध्यवर्ती असलेले बसस्थानक आहे. पैठणीचे माहेरघर असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. प्रवासी हित डोळ्यापुढे ठेवून आम्ही आगाराच्या स्वच्छतेची काळजी घेतली आहे. सौंदर्यांतही विविध उपक्रमाद्वारे भर घातली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ‘या अभियानात आम्ही बाजी मारू’, असा विश्वास आहे."

-प्रवीण हिरे, आगार व्यवस्थापक, येवला

Paintings and decorations on the walls of bus stands.
Caste Validity Certificate Repair News: जातवैधता प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी विशेष मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com